Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात शिकणाऱ्या मध्य प्रदेशच्या 19 वर्षीय तरुणीने संपवले जीवन, कारण गुलदस्त्यात; पोलिसांकडून तपास सुरु

IIT Ponda Farmagudi Goa: फोंडा-फार्मागुडी येथील आयआयटीमध्ये शिकणाऱ्या मध्य प्रदेशच्या 19 वर्षीय विद्यार्थीनीने गर्ल्स हॉस्टेलमधील खोलीत गळफास घेवून जीवन संपवले.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना समोर येतायेत. यातच आता, फोंडा-फार्मागुडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फोंडा-फार्मागुडी येथील आयआयटीमध्ये शिकणाऱ्या मध्य प्रदेशच्या 19 वर्षीय विद्यार्थीनीने गर्ल्स हॉस्टेलमधील खोलीत गळफास घेवून जीवन संपवले. जिव्या विजयकुमार खती असे या विद्यार्थ्यीनीचे नाव आहे. मात्र जिव्याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. फोंडा पोलिस याप्रकरणी तपास करतायेत.

काही दिवसांपूर्वी, पणशे पिसूर्ले सत्तरी येथून अशीच घटना समोर आली होती. येथे एका 22 वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. ही तरुणी साखळी येथील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकत होती. प्रेमप्रकरणातून तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले होते.

हैदराबादच्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले

दरम्यान, हैदराबाद येथील सिरीगम नागराजू (32) याने दाबोळी येथील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. सिरीगम नागराजू हा दाबोळी येथील एका हॉटेलमध्ये उतरला होता. नागराजूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दुपारी दोन वाजता उघडकीस आले होते.

सकाळपासून रुम उघडत नसल्याने हॉटेल कर्मचाऱ्याने दरवाजा ठोठावला, पण कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना नागराजू पंख्याला गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळला. त्यांनी लागलीच याची माहिती वास्को पोलिसांना दिली. वास्को पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GST 2.0: दूध, औषधं, शालेय साहित्य, विमा... 'या' सेवा आणि वस्तूंवर आता 0% जीएसटी, पाहा संपूर्ण यादी

BITS Pilani: नऊ महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू; बिट्स पिलानी कॅम्पसमधील मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशीची मागणी

Mumbai–Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; पोलीसांची दमछाक

Goa Live News: आशिया कपसाठी सर्व 8 संघांची घोषणा

Goa Accident: संजिवनी कारखान्याजवळ कार आणि बाईकचा अपघात; दुचाकी चालक जखमी

SCROLL FOR NEXT