baby Dainik Gomantak
गोवा

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Benaulim Goa: उपचारासाठी चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले.

Pramod Yadav

खेळता खेळता वीज तारेच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का लागून एका १८ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. हे प्रकरण कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडले आहे. बाणावली येथे एका भाड्याच्या खोलीत इतर मुलांसोबत ही चिमुकली खेळत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, खोलीतील एका ठिकाणी 'स्वीचबोर्ड' उघडा होता. खेळता खेळता वीज तारेच्या संपर्कात ती आल्याने त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे कुटुंब मूळचे झारखंडचे, नुकतेच बाणावली येथे राहायला आले होते.

या मुलीची आई स्वयंपाक घरात व्यस्त होती. याचवेळी हे प्रकरण घडले. वडील जवळच्या परिसरात मजुरीचे काम करत होते, तिला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: कोकणवासियांसाठी गुड न्यूज! मुंबई ते मडगाव विशेष गाडी जाहीर; 'या' 23 स्थानकांवर असणार थांबा, पाहा वेळापत्रक

Rajasthan Royals Sale: IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! 15 हजार कोटींना विकली गेली 'राजस्थान रॉयल्स'; कोण आहे नवा मालक?

Honda: सफर गोव्याची! सर्वांचे स्वागत करणारे, मोठ्या जंक्शनचे काम करणारे 'होंडा' गाव

Mangaladitya Rajyog 2026: सूर्य-मंगळाची युती, 2 एप्रिलपासून मंगलादित्य राजयोगाचा चमत्कार; 3 राशींवर होणार धनाचा वर्षाव

Curchorem: कुडचडे सेक्स स्कँडलचा तपास आता 'क्राईम ब्रांच'कडे, नवे धागेदोरे हाती लागणार

SCROLL FOR NEXT