Goa State Revenue Collection Dainik Gomantak
गोवा

Goa Economy: गोव्याच्या महसूल संकलनात 18 टक्के तर भांडवली खर्चात 29 टक्क्यांची वाढ!!

Goa State Revenue Collection: प्रशासकीय सुधारणा, पायाभूत सुविधा, मानवी संसाधने आणि सामाजिक क्षेत्रातील विकास अशा विविध घटकांचा राज्यातील आर्थिक वाढीला हातभार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Revenue Collection and Capital Expenditure

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी राज्यातील महसूल संकलनात (Revenue Collection) १८ टक्के तर भांडवली खर्चात ( Capital Expenditure) २९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

रविवारी (दि. २७ ऑक्टोबर) रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रीनीं आपण वेळोवेळी राज्यातील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत असतो तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतो अशी माहिती स्पष्ट केली. उत्तम वित्तीय व्यवस्थापनामुळे यंदाच्या वर्षी महसूल संकलनात वाढ झाली असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

राज्यातील वित्तीय अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी केले गेलेले केंद्रीय योजनांचे ट्रॅकिंग किंवा प्रशासकीय सुधारणा, पायाभूत सुविधा, मानवी संसाधने आणि सामाजिक क्षेत्रातील विकास अशा विविध घटकांनी राज्यातील आर्थिक वाढीला हातभार लावला, शिवाय केंद्राकडून रिनीवेबल एनर्जी आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले गेल्याने राज्याला आर्थिक उंची गाठण्यास मदत मिळाली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची आहे आणि यासाठी राज्याकडून वेळोवेळी प्रयत्न केले जातील असे देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणालेत.

राज्यातील विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी राज्य सरकारने एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी कर्ज घेण्याची मर्यादा ३,७०० कोटी रुपये ठेवली आहे, मात्र काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जाची ही मर्यादा ४,००० कोटींपेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. मागच्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ मध्ये राज्याने ४,२०० कोटी रुपयांपैकी अंदाजे ३,००० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT