Netravali Wildlife Sanctuary 
गोवा

Netravali: नेत्रावळीत शिकारीचा संशय; कदंबचे 'ते' 16 कर्मचारी जामिनानंतर सेवेतही रुजू

Netravali Wildlife Sanctuary: कर्मचाऱ्यांकडे पाच काडतुसांसह कोयता, कुऱ्हाड आणि जेवण बनविण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले होते.

Pramod Yadav

Netravali Wildlife Sanctuary

नेत्रावळी अभयारण्यात साळजिणी येथे शिकार करुन पार्टी करण्यासाठी गेल्याच्या संशयावरुन कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

सर्व कर्मचाऱ्यांना आज (सोमवार) न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे जामिनानंतर सर्व कर्मचारी कामावर देखील रुजू झाल्याची माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली आहे.

कदंबचे 'ते' 16 कर्मचारी पिकनीकसाठी नेत्रावळी अभयारण्यात गेले होते. त्यांनी अन्न शिवजविण्यासाठी सोबत साहित्य नेले होते, आग पेटवली म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली अटक झालेली नाही. सर्व कर्मचारी मडगाव डेपोत रुजू झाले आहेत, अशी माहिती उल्हास तुयेकर यांनी दिली आहे.

कदंबचे कर्मचारी शिकारीसाठी नेत्रावळीत जात असल्याचा संशय वन खात्याच्या अधिकाऱ्यांना आला. अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करुन सोळा जणांना ताब्यात घेतले.

कर्मचाऱ्यांकडे पाच काडतुसांसह कोयता, कुऱ्हाड आणि जेवण बनविण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले होते.

दरम्यान, सोमवारी त्यांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन देण्यात आला असून, नेत्रावळी अभयारण्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

वनमंत्री विश्वजीत राणे यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत, सर्व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याबाबत मुख्य वनसंरक्षकांना नोटीस बजावल्याचे राणे म्हणाले. संबधित प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT