Covid - 19  Dainik Gomantak
गोवा

Goa Covid News: राज्यभरात 156 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गोव्यातील 112 नागरिक कोरोनामुक्त

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोना थैमानाने जग काहीसं अस्थिर झाले असले तरी गेल्या पाच ते सहा महिन्यात वाढत्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ती पुर्ण थांबलेली नाही. यामूळे राज्यातील नागरिकांना कोरोना नियमावली पाळणे हिताचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात 1472 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 156 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. (156 new corona patients registered in Goa )

मिळालेल्या माहितीनुसार आज राज्यात 156 रुग्णांची भर पडली आहे. तर एका रुग्णाला अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे112 नागरिक कोरोनामुक्त झाल्याने काहीसं दिलासादायक चित्र ही आहे.

सध्या राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 874 इतकी झाली आहे. आज कोरोनामुळे कुणाचाही बळी गेला नसल्याने बळींचा आकडा 3955 इतका कायम राहीला आहे. राज्यात आतापर्यंत 2,52,8०7 नागरिकांना कोविडची बाधा झाली असून यापैकी 2,47,975 लोक पूर्णपणे बरे झालेत.

पाच लाखाच्या अमली पदार्थासह नायजेरियन कळंगुट पोलिसांच्या ताब्यात

गेल्या काही दिवसात नायजेरियन तरुणाला अमली पदार्थ तस्करी प्रकरणात कळंगुट पोलिसांनी पकडलं होतं. याला केवळ 10 दिवस होतात न होतात. तोच आज पुन्हा एकदा नायजेरियन नागरिकाला पोलीसांनी कोकेनसह पकडत कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फिलीप ओबी या नायजेरियन नागरिकाकडून 50 ग्राम कोकेन पकडलं आहे. ही कारवाई कळंगुट पोलिसांनी केली असून पकडलेल्या कोकेनची अंदाजे किंमत 5 लाख रुपये इतकी आहे. पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मागील 10 दिवसांत ही दुसरी कारवाई असून पुन्हा एकदा अमली पदार्थ पुरवठ्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT