13 fishermen who went fishing in Colva Beach were rescued Dainik Gomantak
गोवा

मोठी दुर्घटना टळली! मासेमारीसाठी कोलवा समुद्रात गेलेल्या 13 जणांना बुडण्यापासून वाचवण्यात यश

राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पुरते जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यात मासेमारी करण्यासाठी बंदी असते.

Manish Jadhav

राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पुरते जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यात मासेमारीसाठी बंदी असते. मासेमारी हंगामाला 1 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मासेमारी करणारे ट्रॉलर्स आणि बोटी देखील समुद्रात जाण्यास सज्ज आहेत. दरम्यान कोलवा समुद्रकिनाऱ्यावरुन मासेमारीसाठी जाणारी बोट समुद्रात उलटल्याच्या बातमीने खळबळ उडाली.

दरम्यान, हवामान आणि सुमद्राचा अंदाज न घेताच समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट किनाऱ्यापासून काही अंतरावर उलटली. बोटीमधील मच्छिमार बांधवांनी आरडाआरोड करताच, किनाऱ्यारील जीवरक्षक पर्यटक पोलिसांनी तात्काळ खवळलेल्या समुद्रात बुडणाऱ्या 13 मच्छिमारांसह बोटही किनारी आणली. ही घटना आज सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली. कोलवा किनाऱ्यावरील जीवरक्षक आणि पर्यटक पोलिसांनी त्यांचा आवाज ऐकताच त्यांच्या दिशेने आगेकूच करत त्यांना रेस्क्यू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत मच्छिमार आणि मदतनीस मिळून 13 जण होते. हे सर्वजण मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये गेले होते. मात्र आता त्यांना सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आले आहे. बचावकार्यादरम्यान, एक जीवरक्षक साहिल तुळसकर यांना दुखापत झाली. तुळसकर यांना तात्काळ उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हालवण्यात आले. तर दुसरीकडे, या 13 जणांपैकी एकाला किरकोळ दुखापत वगळता कोणत्याही मच्छिमार बांधवाला दुखापत झालेली नाहीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election: गोव्यात विरोधकांच्या आघाडीची जोरदार तयारी! काँग्रेसची 'आरजी', 'आप'सोबत दोन दिवसांत चर्चा; गोवा फॉरवर्डशीही बोलणी करण्याचे चोडणकरांचे संकेत

Viral Post: 379 रुपयांचं जेवण मागवलं अन् 1,166 रुपयांचं बिल आलं! डिलिव्हरी चार्ज पाहून ग्राहक हैराण, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Goa Politics: काँग्रेसचे 'तिकीट' विक्रीसाठी? नुवेच्या उमेदवारीवरून भाजपचा थेट सवाल; कार्यालयाच्या जागेच्या व्यवहाराबाबत मागितला खुलासा

September 1 Rule Change: 1 सप्टेंबरपासून देशात 7 मोठे बदल! एलपीजी, विमान प्रवास, बँक एफडी आणि कार खरेदीवर होणार थेट परिणाम

Goa Assembly Election: 'मगो'च्या सर्वेक्षणावर भाजपचे मौन! फोंड्यानंतर साखळीसह 12 मतदारसंघांवर दावा

SCROLL FOR NEXT