armed gang robbery case Dainik Gomantak
गोवा

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

Brutal Baina Dacoity Case: या टोळीने घराची झडती घेतली आणि कुटुंबातील सदस्यांना बांधून ठेवले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: सशस्त्र दरोड्याची भयंकर घटना मंगळवारी पहाटे बायणा येथे घडली. तोंडावर मुखवटे घातलेल्या ७-८ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने चामुंडा आर्केडमधील व्यापारी सागर नायक यांच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घुसून सव्वाकोटींचा मौल्यवान ऐवज आणि रोकड लुटली.

अधिक माहिती अशी की, लोखंडी आणि अ‍ॅल्युमिनियमचे रॉड घेऊन ७ ते ८ दरोडेखोर पहाटे २.३० वाजता इमारतीच्या मागील बाजूने नायक यांच्या फ्लॅटमध्ये घुसले. दरोडेखोरांनी बेडरूमचा दरवाजा रॉडने उघडला आणि सागर, त्यांची पत्नी हर्षा, मुलगी आणि हर्षा यांची वृद्ध, आजारी आई यांच्यावर निर्दयीपणे हल्ला केला.

सुरुवातीला सागर यांनी प्रतिकार केला आणि चाव्या देण्यास नकार दिला, तेव्हा हल्लेखोरांनी त्यांना क्रूरपणे मारहाण केली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या टोळीने घराची झडती घेतली आणि कुटुंबातील सदस्यांना बांधून ठेवले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

दिवाळी सणानंतर आणि पर्तगाळ मठातील आगामी कार्यक्रमापूर्वी नायक कुटुंबीयांनी घरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम ठेवली होती. त्याच अनुषंगाने दरोडेखोरांनी हे निवासस्थान लक्ष्य बनविले.

पहाटे ३.०५ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोर मौल्यवान ऐवज आणि रोकड घेऊन पळून गेले. सागर नायक हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात सागर यांनी पत्नी आणि मुलगी देखील जखमी झाली आहे.

दरोडेखोर कॅमेऱ्यात कैद

या घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोव्याचे एसपी, डीवायएसपी आणि विविध पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाली. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि या घटनेची पुष्टी केली.

ते म्हणाले की, गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि पकडण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संकेतांचे विश्लेषण करत आहेत.

गोव्यात घातलेला आणखी एक सशस्त्र दरोडा हा राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रकाश टाकतो. प्रभावी नाकाबंदी आणि पोलिस गस्त नसल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेविषयी चिंता निर्माण झाली आहे. यापुढे, गुन्ह्यांचा शोध घेण्याचा अभिमान बाळगू नका, तर प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करा. सुरक्षितता हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. परंतु भाजप सरकार लोकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे.
युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

आधीच रेकी केल्याची शक्यता

सागर यांची पत्नी हर्षा यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले, की हल्लेखोर तरुण दिसत होते आणि ते बिहारसारख्या भाषेत बोलत होते. त्यांनी असेही नमूद केले, की या दरोडेखोरांना इमारतीचा आराखडा माहीत होता.

ते जाणीवपूर्वक सीसीटीव्ही कॅमेरे टाळत होते. यावरून असे दिसून येते, की त्यांना या परिसराबद्दल आधीच माहिती होती. सर्व दरोडेखोरांचे चेहरे मास्क आणि हेल्मेटने झाकलेले होते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT