Plastic Bag Seized Dainik Gomantak
गोवा

सांगेत 12 हजारांचे हलके प्‍लास्‍टिक जप्‍त

सांगे भागात हलक्या प्रतीच्या प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात

दैनिक गोमन्तक

सांगे: सांगे नगरपालिकेने प्लास्टिक हटाव मोहीम तीव्र केली आहे. पालिका पर्यवेक्षक लुईस फर्नांडिस यांनी मडगावहून सांगे बाजारातील व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी घेऊन येणाऱ्या सुमारे बारा हजार रुपयांचा प्लास्टिक साठा परप्रांतीय युवकांकडून जप्त करण्यात आला. दररोज अशा प्रकारे हलक्या प्रतीच्या प्लास्टिक पिशव्या सांगेतील अनेक व्यापाऱ्यांना वितरित करण्यासाठी मडगाव, फोंडा भागातून येत असल्याचा सुगावा फर्नांडिस यांना लागला होता.

सांगे भागात हलक्या प्रतीच्या प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असल्याचा ठपका ठेवून प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगे पालिकेला गेल्या महिन्यात दोन वेळा सुमारे चार लाखांचा दंड ठोठावला होता. त्याची वसुली म्हणून आणि हलक्या प्रतीच्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना व्यापाऱ्यांनी वितरित करू नये म्हणून सांगे पालिकेने दंड देण्याची मोहीम तीव्र केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganesh Immersion: गणेश विसर्जनासाठी गोव्यात 47 ठिकाणी जीवरक्षक तैनात! 35 समुद्रकिनारे आणि 12 अंतर्गत विसर्जनस्थळी विशेष सुरक्षा व्यवस्था

Indian Ship Attack: अरबी समुद्रात भारतीय जहाजावर भीषण हल्ला! 13 भारतीयांची सुटका, 1 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

Two Wheeler Ban Porvorim: पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना 'नो एंट्री'! अपघातानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 65 किमी वेगमर्यादा, रडार आणि सीसीटीव्हीचीही तयारी

Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! मिताली राजचा रेकॉर्ड मोडीत काढत बनली आशियातील यशस्वी कॅप्टन; भारताने 8व्यांदा जिंकली 'आशिया कप ट्रॉफी'

SCROLL FOR NEXT