1200 gelatin sticks and 300 detonators found in car in Dharbandora Dainik Gomantak
गोवा

खळबळजनक! धारबांदोड्यात कारमध्ये आढळल्या 1200 जिलेटीन कांड्या आणि 300 डेटोनेटर्स, महाराष्ट्रातील दोघांना अटक

सावर्डे भागातील पाषाणाची खाण चालवणाऱ्या व्यवसायिकाकडे स्फोटके बेकायदेशीर नेली जात होती.

Pramod Yadav

1200 gelatin sticks and 300 detonators found in car in Dharbandora

दक्षिण गोव्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. धारबांदोडा येथे कारमध्ये तब्बल 1200 जिलेटीन कांड्या आणि 300 डेटोनेटर्स आढळले आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी (दि.20) केलेल्या धडक करावाईत ही स्फोटके आढळली आहेत. पहाटे केलेल्या या कारवाईत महाराष्ट्रातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

मोहम्मद तांबोळी (वय 35) आणि भुजंग बाळा खटावळ (वय 32) (दोघेही रा. महाराष्ट्र) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

सावर्डे भागातील पाषाणाची खाण चालवणाऱ्या व्यवसायिकाकडे स्फोटके बेकायदेशीर नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकत डेटोनेटर्सचे सहा बॉक्स जप्त केले आहेत.

जिलेटीनचे स्फोट घडवण्यास मनाई

जिलेटीनचे स्फोट घडवून दगड फोडण्यास मनाई आहे. मात्र तरीही स्फोट करण्यासाठी जिलेटीन महाराष्ट्रातून मागवण्यात आली होती. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन आणि अतिरिक्त अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर रामानन यांनी पथकासह ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT