Gambling  Dainik Gomantak
गोवा

पणजीत बेकायदेशीर 'लाईव्ह गेमिंग' खेळणारे 11 लोक जेरबंद

पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: येथील एका तारांकीत हॉटेलातील कसिनोमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर 'लाईव्ह गेमिंग'वर पणजी पोलिसांचा छापा टाकला. पोलिसांनी सुमारे 27 लाख़ रुपये जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. याचबरोबर 'लाईव्ह गेमिंग'मध्ये सहभागी असलेल्या 11 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. (11 people arrested for gambling in Panaji Goa)

टोंक-करंझाळे येथे एका घराच्या गच्चीवर दिवसाढवळ्या सुरू असलेल्या पोकर गेम्स जुगारावर 8 एप्रिल रोजी पणजी पोलिसांनी (Police) छापा टाकून 25 जणांना अटक केली होती. तसेच जुगारासाठी वापरण्यात आलेल्या 883 पोकर चिप्स, कार्डस्‌ तसेच 20,590 रोकड जप्त केली. जुगार प्रतिबंधक कायद्याखाली संशयितांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पणजी (Panaji) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंझाळे येथील एका घराच्या गच्चीवर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती व त्या आधारे त्‍यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा घेऊन तेथे छापा टाकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: फोंड्यात ज्वेलरी शॉपमधून 1.14 कोटींचे सोने लंपास; कर्मचाऱ्यांवरच संशयाची सुई

Penha De Franca: सफर गोव्याची! आपुलकीनं भरलेलं, साध्या लोकांचं गाव 'बिठ्ठोण'

Panaji: पणजी महापौरपदी 'रोहित'च, उपमहापौर 'आगशीकर'; नवनिर्वाचित नगरसेवकांनाही दिली शपथ

Goa Opinion: निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी 'आश्वासने' दिली जातात, नंतर त्या आश्वासनांची 'पूर्तता' कितपत होते?

Cotigao: मध्यरात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडला बिबट्या, अंधारामुळे पडला विहिरीत; वनखात्याचे अथक प्रयत्न यशस्वी

SCROLL FOR NEXT