Baby Dainik Gomantak
गोवा

Abondoned Baby Found in Goa : गोव्यात अर्भक सापडण्याची 5 वर्षांत 11 प्रकरणे!

गंभीर दखल : बाल हक्क संरक्षण आयोगाने मागितला कारवाईचा अहवाल

गोमन्तक डिजिटल टीम

Abondoned Baby Found in Goa : वास्को येथे सापडलेल्या बेवारस अर्भकाच्या धक्कादायक घटनेनंतर गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (जीएससीपीसीआर) त्याची गंभीर दखल घेतली आहे. राज्यात गेल्या पाच वर्षांत सुमारे 11 मृत अर्भकांची प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यासंदर्भात संबंधित खात्याने केलेल्या कारवाईचा अहवाल चार आठवड्यात सादर करण्याचा आदेश आयोगाने महिला व बाल विकास, आरोग्य व पोलिस खात्याला दिला आहे.

अलिकडच्या काळात बेवारस अर्भक सापडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अर्भकांच्या संरक्षणासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी अधिक तयारी व कृती करण्याची गरज आहे, असे मत आयोगाचे अध्यक्ष पीटर एफ बोर्जेस यांनी व्यक्त केले आहे.

2017 ते 2022 या काळात 11 अर्भके सापडली आहेत. त्यापैकी 7 मुली आहेत. त्यातील 4 अर्भके यावर्षी सापडली आहेत. या प्रकरणातील दोन प्रकरणांमध्ये लिंग निर्दिष्ट केलेले नाही. या प्रकरणांवर चिंता व्यक्त करत आयोगाने सरकारी संस्थांनी अशा अर्भक संरक्षणासाठी पुढे येण्याची गरज व्यक्त केली आहे.

मुलाच्या हव्यासापोटी कृत्य

काही अर्भके जिवंत किंवा मृतावस्थेत निर्जनस्थळी किंवा कचरापेट्यांत टाकण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही पालक मुलगी जन्मल्याने व मुलग्याच्या हव्यासापोटी असे कृत्य करत आहेत. त्यामुळे लिंगभेदाबाबत समाजात असलेली चुकीची भावना दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांनी त्याची जनजागृती करण्याची गरज आहे.

कडक कारवाईची गरज

सरकारनेही यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची गरज आहे. जे पालक अशी कृत्ये करतात त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे. अर्भक टाकून देण्याच्या प्रकाराबाबत आयोगाने चिंता व्यक्त करत हे प्रकार थांबण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT