SSC Board Exam Result | Goa Board Exam Results  Dainik Gomantak
गोवा

SSC Board Exam Result: या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल; बोर्डाने घेतला एक महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर

2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

SSC Board Exam Result: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GBSHSE) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. बोर्डाने एका महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

गेल्या महिन्यात राज्यभरातील 31 केंद्रांवरून 10,411 मुले आणि 10,078 मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. सर्व उच्च माध्यमिक शाळांना जारी केलेल्या परिपत्रकात, गोवा बोर्डाने एप्रिल 2023 च्या SSC बोर्ड परीक्षेत जास्तीत जास्त दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या सर्व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश देण्यास सांगितले आहे आणि त्यांना उपचारात्मक शिकवणी देण्यास सांगितले आहे.

कोविड-19 महामारीमुळे 2021-22 शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास झालेला विलंब आणि आंशिक ऑनलाइन वर्ग लक्षात घेऊन गेल्या शैक्षणिक वर्षात ही गोष्ट सुरू करण्यात आली होती.

यंदाही दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही सुविधा देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. एका परिपत्रकात सर्व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळा प्रमुखांशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IIT: गोव्याची जमीन वळवण्याचा डाव फसला? आयआयटीसाठी आता फक्त 4 लाख चौ.मी. जागा; केंद्रानं 10 लाखांचं धोरण बदललं

IPL 2026 Playoff Scenario: मुबंई इंडियन्ससाठी 'करो या मरो'ची स्थिती! एका पराभवानं 'प्लेऑफ'चं स्वप्न भंगणार; जाणून घ्या समीकरणं

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया होणार मर्यादित, मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करून रिपोर्ट पाठवणार केंद्राला; मंत्री खंवटेंनी स्पष्टच सांगितलं

Budh Gochar 2026: ''आर्थिक चणचण संपणार, गुंतवणुकीतून मिळणार अमाप पैसा'', 5 राशींच्या लोकांची चांदीच चांदी; बुध गोचरमुळे आयुष्यात येणार सुखाचे दिवस

Goa BA LLB Entrance Exam: 'गोमंतक' इम्पॅक्ट! बीए एलएलबी गुणवाढ प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मागवला सविस्तर अहवाल; शिक्षण सचिवांना निर्देश

SCROLL FOR NEXT