New Zuari Bridge: Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge: नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील लोडिंगचे काम 100 टक्के पूर्ण

मुख्यमंत्र्यांनी शेअर केले फोटो; उद्घाटनाची उत्सुकता

Akshay Nirmale

New Zuari Bridge: द आर्किटेक्चरल मार्व्हल म्हटल्या जात असलेल्या गोव्यातील नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन कधी याची उत्सुकता आता गोमंतकीयांना लागली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी ट्विट करत या पुलाच्या दुसऱ्या लेनचे कामही शंभर टक्के पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचे फोटोही शेअर केले आहते.

मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, गोव्याचे द आर्किटेक्चरल मार्व्हल असलेला हा पूल आता जवळपास संपूर्ण तयार झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील शंभर टक्के लोडिंगचे काम पूर्ण झाले आहे.

पूर्ण क्षमतेने हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. त्याचा फायदा वाहनधारकांना होणार आहे. गोव्यातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी, या सुविधांना आणखी वाढविण्यासाठी हा पूल महत्वाचा ठरेल.

तसेच आर्थिक संधी प्राप्त होऊन गोव्याच्या विकासासाठीही हा पूल महत्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, नवीन झुवारी पुलाच्या दुसऱ्या लेनचे एकूण काम 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे ‘दिलीप बिल्डकॉन’चे उपाध्यक्ष अतुल जोशी यांनी सांगितले होते. ही लेन खुली झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

गुरुवारपासून या दुसऱ्या लेनची ‘रोड टेस्ट’ केली जाणार आहे. पुढे रेलिंग टाकण्याचे छोटे काम बाकी असून ते या आठवडाभरात पूर्ण होईल, असेही ते म्हटले होते तसेच या लेनचे उद्‍घाटन कधी करायचे हा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT