Rain Canva
गोवा

Goa Rain Update: आज रेड अलर्ट जारी; वाळपई, साखळीसह सांगेत पावसाचे शतक

Goa Monsoon: जुलैच्या सुरवातीपासून पावसाने जोर धरला आहे तो अद्याप कायम आहे

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात मुसळधार पावसाचे धुमशान सुरूच आहे. ४ जून रोजी मॉन्सूनला सुरवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत अवघ्या ४४ दिवसांत वाळपई, सांगे आणि साखळी येथे पावसाने इंचांचे शतक पूर्ण केले. हवामान खात्याच्या वेधशाळेने उद्याही (ता.१९) राज्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

राज्यात संततधार पावसामुळे पडझड, नुकसानीचे सत्र सुरूच असून कुठ्ठाळी जंक्शनजवळ मोठे भूस्खलन होऊन तीन दुचाकी मातीखाली गाडल्या गेल्या. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरे, गावांतील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने लोकांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागात अनेक नद्यांना उधाण आले असून नद्यांचे पाणी रस्त्यांवर आल्याने बऱ्याच गावांशी संपर्क तुटला आहे.

जून महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेतही पाऊस कमी होता; परंतु जुलैच्या सुरवातीपासून पावसाने जोर धरला आहे. तो अद्याप कायम आहे.

उत्तर गोव्यात आतापर्यंत एकूण म्हणजेच ९०.५० इंच तर दक्षिण गोव्यात ८५.४३ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर गोव्यात सरासरीच्या तुलनेत ५०.१ टक्के तर दक्षिण गोव्यात ४७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. अग्निशमन दलाला राज्यभरातून सुमारे ४० कॉल्स आले. त्यांना दलाच्या जवानांनी मदत केली. सुमारे ९० टक्के घटना झाडे पडण्याच्या घडल्या, तसेच संरक्षक भिंती कोसळणे आदी घटना नोंदविण्यात आल्या.

कोठे काय घडले?

पाटो-पणजी भागात रस्त्यावर पाणी साचल्याने बराच काळ वाहतूक खोळंबली.

पणजी चर्च स्क्वेअरजवळ कार व दुचाकीवर भले मोठे झाड पडले. सुदैवाने चौघे प्रवासी बचावले.

धामशे-सत्तरी येथे ‘बीएसएनएल’ने केबलसाठी खोदलेल्या चरांमुळे ८०० मीटर रस्ता खचला.

अनमोड घाटात दूधसागर देवालयाजवळ सकाळी दरड कोसळली होती.

सायंकाळपर्यंत ती माती हटवून मार्ग वाहतुकीस केला खुला.

रगाडा नदीला पूर आल्याने साकोर्डा-मधलावाडा-बोळकर्णे रस्ता पाण्याखाली.

दाबोळवाडा-शापोरा येथे यशवंत गोवेकर यांच्या घरावर झाड पडून दोन लाखांचे नुकसान.

आमरखणे-केरी येथे संरक्षक भिंत कोसळल्यानंतर रस्ताही खचला.

डिचोलीत घरावर कोसळले झाड. मातेसह मुलगा सुरक्षित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: प्रेम व्यक्त करण्यासाठी 'योग्य' दिवस! वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी 'या' वेळी प्रपोज केल्यास होणार फायदा

Missing Womens: 2 ज्येष्ठ महिला अचानक बेपत्ता! मये भागात खळबळ; संशयास्पद ठिकाणी शोधमोहीम सुरु

Bicholim: ..अचानक बँकेचा 'सायरन' वाजू लागला! पोलीस, अग्निशमनची उडाली धावपळ; कारण बघून जीव पडला भांड्यात

Shri Saptakoteshwar: शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या ‘सप्तकोटीश्वर’चा इतिहास उलगडणार, पर्यटन खात्याकडून चित्रपटाची निर्मिती

Goa Shack Policy: शॅक्सच्या ‘सबलेटिंग’ प्रकरणांचा पुनर्विचार होणार! मंत्री खंवटेंनी दिली माहिती; 23 परवान्यांचे होणार नूतनीकरण

SCROLL FOR NEXT