Tragic Student Death Dainik Gomantak
गोवा

Goa News: शाळेच्या शौचालयात बेशुद्धावस्थेत आढळला 10 वर्षीय विद्यार्थी, मेंदूत रक्तस्त्रावामुळे झाला मृत्यू

Tragic Student Death: मडगावातून विद्यार्थ्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Pramod Yadav

वेर्णा: नागवा येथे एका शाळेच्या शौचालयात १० वर्षीय विद्यार्थी बेशुद्धावस्थेत आढळला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. ०८ मार्च रोजी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागवा, वेर्णा येथील शाळेच्या शौचालयात एक १० वर्षीय विद्यार्थी बेशुद्धावस्थेत आढळून आला. ०८ मार्च रोजी ही घटना उघडकीस आली. शालेय कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याला तात्काळ मडगाव रुग्णालयात दाखल केले.

मडगावातून विद्यार्थ्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, येथेच उपचारादरम्यान, विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर विद्यार्थ्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यातून मात्र, मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. वेर्णा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT