Goa News
Goa News  Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case: डिकुन्हा कुटुंबाने पत्रकार परिषदेत घेऊन केला भांडाफोड: म्हणाले, 10 हजार चौरस मीटर जागा...

गोमन्तक डिजिटल टीम

सुरावली येथील आपली ७७/१ व ८२ सर्व्हे नंबराखालील १० हजार चौरस मीटर जागा हडप करण्‍यात आल्‍याचे मूळ सुरावली येथील व विवाहानंतर कळंगुट येथे राहणाऱ्या कार्मेलीन डिकुन्हा, तिच्या बहिणी इदा डिकुन्हा व माशिया डिकुन्हा तसेच भाऊ तेवोफिना डिकुन्हा यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

या जमिनीच्या मूळ मालकीण होत्या त्यांच्या आईच्या मामाच्या मुली मारिया एलिना आब्रेऊ कॉस्ता व मारिया एलमिरा पिएदाद आब्रेऊ कॉस्ता. त्‍या अविवाहित होत्या. त्यांचे निधन १९८७ झाली झाले. त्‍यांच्‍या निधनाचा तसेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याचा दाखला आमच्याकडे असल्याचे कार्मेलीन डिकुन्हा यांनी सांगितले.

या दोघी बहिणांच्या निधनानंतर १९९२ साली त्यांचा भाऊ रामिलो राफाईल कॉस्ता व त्याच्‍या बायकोन सक्सेशन डीडद्वारे ती जागा आपल्या नावावर करून घेतली. त्यांनासुद्धा काहीच अपत्य नसल्याने शेवटी त्या जागेचे मालक आपण असल्याचा दावा कार्मेलिना यांनी केला. रामिलो यांचे निधन २०१३ व त्‍यांच्‍या पत्नीचे निधन २०१४ साली झाले.

अन्‌ आश्‍चर्याचा धक्का

अलीकडेच आपण या जमिनीसंदर्भातील जाहीरात वर्तमानपत्रात पाहिली व कागदपत्रे मिळविली. ही जागा ग्लेन आग्नेलो कॉस्ता व त्याची पत्नी कॅरोल रोझी ग्रासियस जी सध्‍या इंग्लंडमध्ये राहतात, त्यांच्या नावे असल्याचे पाहून आम्हाला आश्र्चर्य वाटले व धक्काच बसला.

आपण कागदपत्रे मिळविली त्यात ग्लेनने आपण मारिया एलिना आब्रेऊ कॉस्ता यांचा नातू असल्याचे भासविले आहे. तसेच मारियाचा विवाह दुमिंगो नामक व्यक्तीशी झाल्याची खोटी माहिती इनवेंटरी प्रक्रियेत दिली आहे. शिवाय मारिया एलिना आब्रेऊ कॉस्ता व मारिया एल्मिरा पिएदाद आब्रेऊ कॉस्ता या एकच असल्याचे भासवले असल्याचे कार्मेलीन यांनी सांगितले.

दोन वेळा झाले निधन?

पणजी महानगरपालिकेत दोघी बहिणींचे निधन १९८७ साली झाल्याचा दाखल आपल्याला मिळाला. मात्र इनवेंटरी प्रक्रियेत त्यांचे निधन १९७३ व १९७६ मध्ये झाल्याचे भासविले आहे. त्यानंतर आपण आरटीआय अर्जाद्वारे त्यांचा निधनाच्या दाखल्याची विनंती केली. त्यानंतर मनपाने सिस्टमवरुन नोंदी बदलल्या व दोन्ही बहिणींची नावे खोडून ती अज्ञात असल्याची नोंद केली. या प्रकरणाने आमची जागा हडप झाल्याचा संशय पक्का झाला.

ग्लेन व कॅरोलने फॉर्म १ व १४ मध्ये कपटाने मूळ नावे खोडून तिथे आपली नावे घातली. ग्लेन व कॅरोल एरवी कळंगुट येथील रहिवाशी. मात्र त्यांनी ती सुरावलीत राहतात असे इनवेंटरी प्रक्रियेत खोटे सांगितल्याचे उघड झाले आहे, असे कार्मेलीन यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT