Rajbagh Beach Dainik Gomantak
गोवा

जोरदार लाटांमुळे होडी उलटली! दहाजणांना जीवनदान, बोट आणि जाळ्‍यांचे मात्र नुकसान

Rajbagh Boat Accident: पाटणे येथीलही बोट सकाळी समुद्रात जोरदार लाटांच्या माऱ्याने उलटली

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: तारीर-राजबाग येथील समुद्रात मासेमारी करून तळपण जेटीजवळ येत असताना मच्छीमारी होडी जोरदार लाटांच्या माऱ्यामुळे उलटली. त्‍यामुळे बोटीवरील दहा खलाशी पाण्‍यात पडले. लागलीच हालचाल करून स्थानिक व जीवरक्षकांनी त्‍या सर्वांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. त्‍यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु बोट आणि त्‍यावरील जाळ्‍यांचे नुकसान झाले.

मासेमारी हंगाम सुरू झाल्‍यापासून समुद्रात कोळंबी तसेच अन्‍य मासळी विपुल प्रमाणात मिळू लागली आहे. त्‍यामुळे अनेक बोटी, ट्रॉलर्स समुद्रात जात आहेत. विशेषत: अजूनही समुद्र शांत झालेला नाही.

५० हजारांची मासळी गेली वाहून

पाटणे येथील दीपक गोपाळ पागी यांची ही बोट सकाळी समुद्रात मासेमारी करून तळपण जेटीजवळ येत असताना राजबाग-तळपण येथील ‘देवाफातर’ येथे जोरदार लाटांच्या माऱ्याने उलटली. या बोटीत सुमारे ५० हजार किमतीची मासळी होती. बोट उलटल्यानंतर मासळी समुद्रात वाहून गेली. जाळ्‍यांचेही नुकसान झाले. खलाशांना वाचविण्‍यास यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Oben Rorr EZ Sigma: 175 किमी रेंज, जबरदस्त लूक… ओबेन रोर ईझेड सिग्मा बाईक भारतात लाँच; ओलाला देणार टक्कर

Beef Seized: कर्नाटकातून गोव्यात अवैध गोमांस तस्करी; मोले तपासणी नाक्यावर 620 KG बीफ जप्त Video

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, अनेक घरं गेली वाहून; 4 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Shubman Gill: मालिकावीर शुभमन गिलला पदकासोबत मिळाली 'दारूची बाटली', कारण काय? किती आहे किंमत? जाणून घ्या

Konkani Language: 38 वर्षांत राजपत्र कोकणीतून प्रकाशित करण्याचा प्रयत्नही कुठल्या सरकारला करता आला नाही; भाषा अभिमान आणि वास्तव

SCROLL FOR NEXT