Margao Dainik Gomantak
गोवा

Margao News : उल्‍हास वेर्लेकर कुटुंबीयांकडून विविध संस्‍थांना १० लाखांची देणगी; लग्नाच्या वाढदिनी भेट

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

मडगाव, उल्‍हास ज्वेलर्स या प्रसिद्ध सुवर्ण आस्‍थापनाचे मालक उल्‍हास वेर्लेकर आणि त्‍यांच्‍या पत्‍नी मीता वेर्लेकर यांच्‍या लग्‍नाचा सुवर्णमहोत्‍सवी वाढदिन काल ९ रोजी पार पडला.

यानिमित्त या कुटुंबीयांकडून गोव्‍यातील वेगवेगळ्‍या शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाख अशा एकूण १० लाख रुपयांची देणगी देऊन त्‍यातून वेगवेगळे उपक्रम राबविण्‍यास सांगितले.

या संस्‍थांमध्‍ये कोकणी भाषा मंडळ, अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्‍मण युवा संघटना, दैवज्ञ ब्राह्‍मण समाज सेवा संघ, विद्याविकास मंडळ, दैवज्ञ समाज, मठग्रामस्‍थ हिंदू सभा, ज्ञानेश्वरी महिला मंडळ, गोमंतक दैवज्ञ ब्राह्‍मण समाजोत्‍कर्ष मंडळ, गोमंत विद्या निकेतन, द गोवा हिंदू असोसिएशनचे स्‍नेहमंदिर आदी संस्‍थांचा समावेश आहे.

मठग्रामस्थ स्मशानभूमीत रोपट्यांची लागवड

उल्‍हास वेर्लेकर हे स्‍व. शंकर शेट वेर्लेकर यांचे पणतू असून १९३३ साली शंकर शेट वेर्लेकर यांनी मठग्रामस्‍थ हिंदू सभेची स्‍मशानभूमी उभारण्‍यासाठी मदत केली होती. त्‍या प्रीत्‍यर्थ त्‍यांचा एक अर्धपुतळा या स्‍मशानभूमीत उभारण्‍यात आला आहे.

उल्‍हास वेर्लेकर यांच्‍या सुवर्णमहोत्‍सवी विवाह वर्ष सोहळ्यानिमित्त या जागेची डागडुजी करण्‍याबरोबरच स्‍मशानभूमी आवारात ५० रोपटी लावण्‍यात आली. यावेळी मठग्रामस्‍थ हिंदू सभेचे अध्‍यक्ष भाई नायक तसेच अन्‍य पदाधिकारी उपस्‍थित होते.

वेर्लेकर कुटुंबीयांतर्फे उल्‍हास वेर्लेकर यांचे पुत्र प्रितम व त्‍यांची पत्‍नी मिताली, त्‍यांचे दुसरे पुत्र विक्रम व त्‍यांच्‍या पत्‍नी श्वेता, त्‍यांच्‍या कन्‍या टीना रोहित वेर्लेकर मेहता आणि नातवंडे उपस्‍थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT