Car Robbed Dainik Gomantak
गोवा

Car Robbed In South Goa: मुंबईतील व्यापाऱ्याच्या गाडीची काच फोडून 1.10 लाखांची चोरी; मोबाईल, टॅब, सोने लंपास

मुंबईतील एका व्यापाऱ्याने कुंकळ्ळी पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Car Robbed In South Goa दक्षिण गोव्यातील 'काब दे राम' येथे पार्क केलेल्या एका गाडीची काच फोडून आतील बॅगेची चोरी करण्याचा प्रकार शनिवारी घडला असून या बॅगेत 1.10 लाखांचा ऐवज होता असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुंबईतील एका व्यापाऱ्याने कुंकळ्ळी पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली आहे.

दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या काब द राम येथे अज्ञात चोरटयाने मुंबईतील एका व्यापाऱ्याची कारमध्ये ठेवलेली बॅग कारची काच फोडून चोरून नेली. या बॅगमध्ये टेब, मोबाईल व सोन्याचे रिंग मिळून 1 लाख 10 हजारांचा ऐवज होता.

याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंसंच्या 379 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत खरात पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी अमित भागवत यांनी ही तक्रार दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT