1 lakh 30 thousand worth of drugs seized at Marcel  Dainik Gomantak
गोवा

1 लाख 30 हजारांचा अमली पदार्थ माशेल येथे जप्‍त

संशयित सूरज रामप्रताप साह हा मूळ बिहार येथील असून तो सध्या कुंभारजुवे-माशेल येथे राहतो.

दैनिक गोमन्तक

फोंडा: माशेल येथे काल रात्री एका युवकाकडून गांजा हस्‍तगत करण्‍यास फोंडा पोलिसांना यश मिळाले. संशयित सूरज रामप्रताप साह हा मूळ बिहार येथील असून तो सध्या कुंभारजुवे-माशेल येथे राहतो. तो माशेल येथे अंमलीपदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे 1300 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. त्‍याची किंमत 1 लाख 30 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयिताला अटक करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या कारवाईत फोंडा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक साजित पिल्ले, हेड-कॉन्स्टेबल वंदेश सतरकर, कॉन्स्टेबल अमेय गोसावी, मयूर देसाई व आदित्य नाईक यांनी भाग घेतला. पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT