World legends pro t20 league Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Legends T20 League Goa: शेन वॉटसन, शिखर धवन, हरभजन सिंग खेळणार गोव्यात! वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० लीग क्रिकेटचा थरार

World legends pro t20 league: महान टेनिसपटू, जागतिक टेनिस दुहेरीतील माजी अग्रमानांकित महेश भूपती यांच्या मताशी गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही सहमती दर्शविली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनात आम्हाला गोव्यात भरपूर सहकार्य लाभले, त्यामुळे स्पर्धा येत्या दशकभरात गोव्यातच घेण्यात आम्हाला आनंद वाटेल, असे महेश भूपती यांनी रविवारी सांगितले. ते वर्ल्ड लीजंड्स स्पर्धेचे आयोजक ‘एसजीएई’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत.

महान टेनिसपटू, जागतिक टेनिस दुहेरीतील माजी अग्रमानांकित महेश भूपती यांच्या मताशी गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही सहमती दर्शविली. क्रीडा पर्यटनाने गोव्यासाठी महत्त्व अधोरेखित करताना खंवटे यांनी वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० लीगसाठी गोवा हे कायमस्वरुपी केंद्र करण्यासाठी प्राधान्यक्रम राहील असे नमूद केले.

सहा फ्रँचाईजी संघांच्या स्पर्धेची अधिकृत घोषणा रविवारी दोना पावला पत्रकार परिषदेत झाली. स्पर्धेला सोमवारपासून (ता. २६) वेर्णा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या १९१९ स्पोर्टस स्टेडियमवर सुरवात होईल.

पत्रकार परिषदेत भारताचे माजी कसोटीपटू हरभजन सिंग, शिखर धवन, पियुष चावला, नमन ओझा, ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू शेन वॉटसन, वेस्ट इंडीजचा कार्लोस ब्राथवेट यांची उपस्थिती होती. स्पर्धा २६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत खेळली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

SCROLL FOR NEXT