T20 Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

T20 Cricket: गोव्याच्या फलंदाजांचा सूर हरपला; विदर्भाची 7 विकेट्सनी सहज बाजी

Goa vs Vidarbha: गोव्याच्या आरंभीच्या फलंदाजांचा सूर हरपला, परिणामी विदर्भाने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सात विकेट्स आणि १५ चेंडू राखून सोपा विजय संपादला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या आरंभीच्या फलंदाजांचा सूर हरपला, परिणामी विदर्भाने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सात विकेट्स आणि १५ चेंडू राखून सोपा विजय संपादला. एलिट ड गट सामना शनिवारी कोलकता येथील जादवपूर विद्यापीठ मैदानावर झाला.

विदर्भाने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. सुरवातीचे चार फलंदाज विशेष प्रतिकार करू शकले नाहीत, त्यामुळे आठव्या षटकात गोव्याचा डाव ४ बाद ४६ असा घसरला. त्यानंतर गोव्याला आवश्यक धावगती राखणे कठीण गेले. गोव्याला निर्धारित २० षटकांत ९ बाद १४६ धावाच करता आल्या.

दीपराज गावकरने सर्वाधिक ३९ धावा करताना ३७ चेंडूंतील खेळीत दोन चौकार व एक षटकार मारला. सलामीचा फलंदाज कर्णधार अथर्व तायडे (५२) व रविकुमार समर्थ (५३) यांची अर्धशतके आणि त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७७ चेंडूंत केलेल्या १०४ धावांच्या भागीदारीमुळे विदर्भाने सामना आरामात जिंकला. त्यांनी १७.३ षटकांत ३ बाद १५० धावा केल्या. गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना १६ नोव्हेंबर रोजी उत्तराखंडविरुद्ध होईल.

संक्षिप्त धावफलक

गोवा: २० षटकांत ९ बाद १४६ (शिवेंद्र भुजबळ ६, ईशान गडेकर १७, अभिनव तेजराणा २, सुयश प्रभुदेसाई ४, दीपराज गावकर ३९, ललित यादव १८, दर्शन मिसाळ १५, विकास सिंग १७, फेलिक्स आलेमाव २, वासुकी कौशिक नाबाद १०, शुभम तारी नाबाद ९, सौरभ दुबे ४-०-३०-४) पराभूत वि. विदर्भ: १७.३ षटकांत ३ बाद १५० (अथर्व तायडे ५२, रविकुमार समर्थ ५३, वेदांत जाजू नाबाद २३, वासुकी कौशिक ४-०-२९-०, फेलिक्स आलेमाव २.३-०-१७-१, शुभम तारी ४-०-३८-२, दीपराज गावकर ३-०-२०-०, विकास सिंग १-०-११-०, ललित यादव २-०-१९-०, दर्शन मिसाळ १-०-११-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Football League: धेंपो क्लबसमोर गोल करण्याचे आव्हान; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी चानमारी एफसीशी लढत

Mental Wellbeing: गोंगाटाच्या जगात मनाला हवे एक अदृश्य अंगण; स्वतःसाठी जपलेला शांततेचा कोपरा

गोवा खरोखरच 'मेला' आहे का? वाढती गुन्हेगारी, महिलांची असुरक्षितता आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न

Goa Politics: शिवराळ भाषा, सालस थापा आणि राजकीय सभ्यता; गोव्याच्या राजकारणाचा नवा चेहरा!

Political Betrayal in Goa: 500 वर्षांनंतरही विश्वासघाताची सावली; गोव्याच्या राजकारणाला आत्मपरीक्षणाची गरज

SCROLL FOR NEXT