Goa Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याचा टी-20 स्पर्धेत सलग चौथा पराभव; केरळची 11 धावांनी बाजी

Syed Mushtaq Ali T20 Cricket Trophy 2024: हैदराबादमधील पाऊसही गोव्याच्या मदतीला येऊ शकला नाही. त्यामुळे सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ई गटात त्यांच्यावर केरळने व्हीजेडी पद्धतीनुसार ११ धावांनी मात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Syed Mushtaq Ali Trophy Goa Vs Kerala

पणजी: हैदराबादमधील पाऊसही गोव्याच्या मदतीला येऊ शकला नाही. त्यामुळे सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ई गटात त्यांच्यावर केरळने व्हीजेडी पद्धतीनुसार ११ धावांनी मात केली.

पावसाळी वातावरणात रविवारी प्रकाशझोतात झालेला सामना प्रत्येकी १३ षटकांचा करण्यात आला. केरळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४३ धावा केल्या. नंतर सलामीच्या ईशान गडेकर याच्या आक्रमक ४५ धावांच्या बळावर गोव्याने ७.५ षटकांत २ बाद ६९ धावा केल्या असता जोरदार पावसाला सुरवात झाली व नंतर खेळ होऊ शकला नाही. खेळ थांबला तेव्हा केरळचा संघ व्हीजेडी पद्धतीनुसार ११ धावांनी पुढे होता. त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

गोव्याचा हा सलग चौथा पराभव ठरला. गतमोसमाच्या तुलनेत ही त्यांची अतिशय खराब कामदिरी आहे. त्यांचे आता आणखी दोन सामने बाकी आहेत. पुढील सामना तीन डिसेंबर रोजी महाराष्ट्राविरुद्ध होईल, नंतर अखेरची लढत नागालँडविरुद्ध पाच डिसेंबर रोजी खेळली जाईल.

दुखापतीमुळे डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर केरळविरुद्धच्या लढतीत खेळू शकला नाही. त्याच्या जागी २३ वर्षांखालील संघातील सदस्य अझान थोटा याला संघात सामावून घेण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

केरळ ः १३ षटकांत ६ बाद १४३ (संजू सॅमसन ३१- १५ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, रोहन कुन्नुम्मल १९, सलमान निझार ३४- २० चेंडू, ३ चौकार, १ षटकार, अब्दुल बाझिथ २३, एम. एन. शराफुद्दीन नाबाद ११, शुभम तारी ३-०-३३-१, मोहित रेडकर ३-०-२९-२, फेलिक्स आलेमाव ३-०-३२-२, दर्शन मिसाळ २-०-२८-०, दीपराज गावकर २-०-१८-१) वि. वि. गोवा ः ७.५ षटकांत २ बाद ६९ (ईशान गडेकर नाबाद ४५- २२ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, अझान थोटा ५, कश्यप बखले ५, सुयश प्रभुदेसाई नाबाद ९, जलाज सक्सेना २-०-५-१, बासिल थम्पी १-०-४-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT