Super Series Cricket League UAE Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

UAE Super Series: दुबईतील गोमंतकीयांची ‘सुपर सीरिज लीग’! साखळी ईगल्स सलग दुसऱ्या वर्षी विजयी; 5 क्रिकेट संघांचा समावेश

Cricket League UAE Super Series: साखळी ईगल्सच्या विजेतेपदात महंमद रफी (भाऊ), फरहान खान, बाबुल चमनसाब, लियाकत बेपारी, कर्णधार युनूस शेख यांचे सातत्य निर्णायक ठरले.

Sameer Panditrao

पणजी: टीम सुपर सीरिज यांच्यातर्फे पाच महिन्यांच्या कालावधीत घेण्यात आलेल्या संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) गोमंतकीय क्रिकेट संघांची ‘सुपर सीरिज क्रिकेट लीग’ स्पर्धा साखळी ईगल्सने सलग दुसऱ्या वर्षी जिंकली. त्यांनी सर्वाधिक ६७ गुणांची कमाई केली.

स्पर्धेतील उपविजेत्या पेट्रोमन संघाने ६०, तसेच तिसऱ्या क्रमांकावरील सांगे वॉरियर्सने ४८ गुणांची नोंद केली. जॉली टायगर्स गोल्डन संघाने ४४ गुणांसह चौथा, तर करमा ३२ वॉरियर्सने १५ गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.

साखळी ईगल्सच्या विजेतेपदात महंमद रफी (भाऊ), फरहान खान, बाबुल चमनसाब, लियाकत बेपारी, कर्णधार युनूस शेख यांचे सातत्य निर्णायक ठरले. विजेत्या संघातर्फे संघ मालक याकुब सय्यद व आसिफ आगा यांनी करंडक स्वीकारला. बक्षीस वितरण पेट्रोमन स्पोर्टस मॅनेजमेंटचे सीईओ अब्दुल लतिफ खान यांच्या हस्ते झाले. पुरस्कार वितरण समारंभास अश्रफ अली बेग (म्हापसा-दुबई) यांचे सहकार्य लाभले.

तसूफ जमादार (पेट्रोमन, उत्कृष्ट फलंदाज व मालिकेतील उत्कृष्ट खेळाडू), बाबुल चमनसाब (साखळी ईगल्स) व ईस्माईल शेख (पेट्रोमन, उत्कृष्ट गोलंदाज विभागून), आकिब शाह (सांगे वॉरियर्स, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक), युनूस शेख (साखळी ईगल्स, विशेष पुरस्कार) यांना वैयक्तिक, तर पेट्रोमन (उत्कृष्ट आयोजक) व सांगे वॉरियर्स (उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ) यांना सांघिक पुरस्कार देण्यात आला.

विजयी संघ

विजेत्या साखळी ईगल्स संघाचे युनूस शेख (कर्णधार), इरफान सय्यद, बाबुल चमनसाब, महंमद रफी (भाऊ), फरहान खान, लियाकत बेपारी, शेर खान, जॅकुल्ला शेख, अलराफ शेख, इक्बाल मकंदर, महंमद खान (बाबा), आसिफ आगा, अझिम शेख, सैफ शेख, आसिफ सय्यद, सम्मान शेख, अब्दुल फिरदोस शेख, महमंद जुबेर, सैफ सय्यद, सय्यद परवेझ, याकुब सय्यद (संघ मालक) यांनी प्रतिनिधित्व केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT