Shubman Gill Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Shubman Gill Breaks Virat Kohli: टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून शुभमन गिल वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे.

Manish Jadhav

Shubman Gill Breaks Virat Kohli: टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून शुभमन गिल वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध गिलने पुन्हा एकदा कमाल केली. तो आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून त्याच्या फॉर्मवर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. त्याने दुसऱ्या कसोटीच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडला. 7 वर्षांपूर्वी विराटने हा रेकॉर्ड केला होता. कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या मालिकेत गिल धावांचा पाऊस पाडत आहे. गिलने एजबॅस्टन मैदानावर भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला.

दरम्यान, इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा (Team India) कर्णधार बनवण्यात आलेल्या शुभमन गिलवर सर्वांच्या नजरा होत्या. कारण त्याचा कसोटी रेकॉर्ड फारसा चांगला नव्हता. त्याशिवाय, त्याची बॅट आशियाबाहेर चालली नाही आणि गेल्या 5 वर्षांत त्याने एकदाही 50 चा टप्पा ओलांडला नव्हता. विशेषतः इंग्लंडमध्ये 3 कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून केवळ 88 धावा आल्या होत्या. पण आता मालिकेतील केवळ 3 डावांमध्ये गिलने आपला क्लासच वेगळा आहे हे दाखवून दिले.

कारकिर्दीतील सर्वाधिक धावसंख्या

लीड्स कसोटीत शानदार शतक झळकावून मालिकेची दमदार सुरुवात करणाऱ्या भारतीय कर्णधार गिलने सलग दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले. सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावणाऱ्या गिलने दुसऱ्या दिवशीही आपला जलवा दाखवून दिला. पहिल्या सत्रातच त्याने 150 धावांचा टप्पा ओलांडला. यासह गिलने केवळ कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्याच नाहीतर माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) रेकॉर्डही मोडला. याआधी गिलचा सर्वोच्च धावसंख्या 147 धावांचा होता, जो त्याने शेवटच्या कसोटीतच केला होता.

कोहलीचा 7 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

गिलने 150 धावांचा टप्पा गाठताच त्याने कोहलीचा रेकॉर्डही मोडला. एजबॅस्टन येथे भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आता गिलच्या नावावर आहे. यापूर्वी, हा रेकॉर्ड कोहलीच्या नावावर होता, ज्याने 2018 च्या कसोटीत 149 धावा केल्या होत्या. गिलच्या आधी या मैदानावर शतक करणारा कोहली एकमेव भारतीय कर्णधार होता. त्याचवेळी, या मैदानावर भारतीय फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्डही आता गिलच्या नावावर आहे.

एवढेच नाहीतर गिलने या मालिकेत आतापर्यंत फक्त 3 डावात 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशाप्रकारे, वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तो आशिया खंडाबाहेर कसोटी मालिकेत 300 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. गिलने पहिल्या कसोटी सामन्यात 147 धावांच्या शतकासह एकूण 155 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT