Goa State Level Swimming Competition Winner Shravya Phadte Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Sports: राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत श्रव्या फडतेने तब्बल आठ पदकांसहित मिळवली चॅम्पियनशिप

Goa State Level Swimming Competition: अखिल गोवा पातळीवरील जलतरण स्पर्धेत मुलींच्या गट ४ मध्ये चॅम्पियनशिपसह आठ पदके पटकावल्याबद्दल तिचे परिसरात कौतुक होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

करंजाळ - मडकई येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी श्रव्या समीर फडते हिने अखिल गोवा पातळीवरील जलतरण स्पर्धेत मुलींच्या गट ४ मध्ये चॅम्पियनशिप प्राप्त केली. तिने एकूण आठ पदके पटकावल्याबद्दल तिचे या परिसरात कौतुक होत आहे.

ही स्पर्धा गोवा जलतरण संघटनेतर्फे फोंडा येथील क्रीडा जलतरण संकुलात नुकतीच झाली. तिने १०० मिटर फ्रीस्टाइल, ५० मि. फ्रीस्टाईल, ४ x ५० मि. मेडले रिले, ४ x ५० मि. फ्रीस्टाइल रिलेमध्ये सुवर्णपदके तसेच ५० मि. ब्रेस्ट स्ट्रोक, ५० मि. बॅक स्ट्रोक, ५० मि. बटरफ्लाय व २०० मि. आय. एम. प्रकारात रजत पदके प्राप्त केली. तिच्या या यशाबद्दल शाळेच्या पालक - शिक्षक समितीतर्फे तसेच ग्रामस्थांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT