Rotary Rain Run Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Rotary Rain Run Goa: रोटरी रेन रन मॅरेथॉनमध्ये महिला पेसर्स; 26 जुलै रोजी शर्यत; तीन हजार धावपटूंचा सहभाग अपेक्षित

Goa Marathon July 2026: रोटरी रेन रन मॅरेथॉनमध्ये पुन्हा एकदा महिला पेसर्सचे पथक उल्लेखनीय ठरणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: रोटरी रेन रन मॅरेथॉनमध्ये पुन्हा एकदा महिला पेसर्सचे पथक उल्लेखनीय ठरणार आहे. या मॅरेथॉनची १२ आवृत्ती २६ जुलै रोजी होणार असून शर्यतीस कुजिरा येथील अटल स्टेडियमवर सुरवात होईल. स्पर्धेत सुमारे तीन हजार धावपटू भाग घेण्याची शक्यता आहे.

स्पर्धेची माहिती स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष अविनाश परमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी रोटरी रेन रन आणि भारतीय लष्कर यांच्यातील वाढत्या सहकार्याचाही आवर्जून उल्लेख केला. यंदाही ‘रोटरी रेन रन’मध्ये २१.१ किलोमीटर अर्ध मॅरेथॉन, १० किलोमीटर धाव, ५ किलोमीटर फन रन आणि २ किलोमीटर फॅमिली रन यांचा समावेश आहे.

पत्रकार परिषदेस ‘रोटरी रेन रन’चे सह-अध्यक्ष शेफन शेख, रोटरी क्लब ऑफ पर्वरीचे अध्यक्ष डॉ. अमित पाटील, तसेच रोटरी क्लब ऑफ पर्वरीच्या प्रमुख सामाजिक उपक्रमांपैकी एक असलेल्या ‘प्रकाश कर्करोग मदत प्रकल्पा’चे अध्यक्ष निखिल शाह यांची उपस्थिती होती. यावेळी ‘रोटरी रेन रन’ जर्सीचेही अनावरण झाले.

या स्पर्धेतून उभारण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि सामुदायिक विकास या क्षेत्रांतील रोटरीच्या अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांना बळ मिळाले असून हजारो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात यश आले आहे,” असे उपस्थितांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT