RCB Victory Parade Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

RCB Victory Parade: चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर RCB च्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी; 11 जणांचा मृत्यू, 24 जखमी

RCB Victory Rally Stampede: आयपीएल 2025 चा किताब किंग कोहलीच्या आरसीबीने जिंकला. त्यानंतर बुधवारी (4 जून) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) च्या खेळाडूंची व्हिक्ट्री परेड काढण्यात आली. या परेडला चाहत्यांनी मोठी गर्दी केली.

Manish Jadhav

आयपीएल 2025 चा किताब किंग कोहलीच्या आरसीबीने जिंकला. त्यानंतर बुधवारी (4 जून) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) च्या खेळाडूंची व्हिक्ट्री परेड काढण्यात आली. या परेडला चाहत्यांनी मोठी गर्दी केली. यादरम्यान एक दुर्घटना घडली. व्हिक्ट्री परेडमध्ये चेंगराचेंगरी झाली. बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान, गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी कशी झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, आरसीबीच्या व्हिक्ट्री परेडमध्ये मोठ्या संख्येने चाहते चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर उपस्थित होते. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. परेड संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार होती, परंतु ती होऊ शकली नाही. तत्पूर्वी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी खेळाडू विधानसभेत पोहोचले असून त्यानंतर खेळाडूंची बस चिन्नास्वामी स्टेडियमकडे जाणार आहे.

आरसीबीचा जल्लोष शोकात बदलला

आरसीबीचा (RCB) विजयोत्सव शोकात बदलला. गर्दीवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद जिंकले. या विजयानंतर कर्नाटकसह देशातील अनेक शहरांमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला, परंतु आता संघाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीने या विजयाला धुसर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT