Arjun Tendulkar Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: अर्जुन तेंडुलकरने लढवला किल्ला! फॉलोऑन टाळण्यासाठी गोव्याचा जोरदार संघर्ष; कर्नाटक 200 धावांनी पुढे

Arjun Tendulkar: शिमोगा येथील कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या नवुले स्टेडियम सुरू असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी पावसाळी वातारणामुळे फक्त ६४ षटकांचाच खेळ होऊ शकला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अर्जुन तेंडुलकर व मोहित रेडकर या सातव्या विकेटने झुंज दिलेली असली, तरी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गटातील लढतीत गोव्याचा फॉलोऑन टाळण्यासाठी अजूनही संघर्ष सुरू आहे. चार विकेट बाकी असताना त्यांना नामुष्की टाळण्यासाठी आणखी ५१ धावांची गरज असून यजमान कर्नाटक संघ अजूनही २०० धावांनी पुढे आहे.

शिमोगा येथील कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या नवुले स्टेडियम सुरू असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी पावसाळी वातारणामुळे फक्त ६४ षटकांचाच खेळ होऊ शकला. कर्नाटकच्या पहिल्या डावातील ३७१ धावांना उत्तर देताना गोव्याने खेळ थांबला तेव्हा ६ बाद १७१ धावा केल्या होत्या.

अर्जुन ४३ धावांवर खेळत असून मोहितने २४ धावा केल्या आहेत. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ५६ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. त्यापूर्वी, डाव ६ बाद ११५ असा संकटात असताना गोव्यासमोर फॉलोऑनची शक्यता जास्त होती. त्यानंतर अर्जुन व मोहित यांनी १४२ चेंडू किल्ला लढवत कर्नाटकच्या गोलंदाजांना सतावले.

रात्री पडलेल्या पावसामुळे सोमवारी सकाळच्या सत्रात तासाभराचा खेळ वाया गेला, तसेच दिवसअखेर अंधूक प्रकाशामुळे खेळाडूंना लवकर ड्रेसिंग रुममध्ये परतावे लागले. कालच्या १ बाद २८ वरुन गोव्याची कर्नाटकच्या धारदार माऱ्यासमोर ४ बाद ५१ अशी स्थिती झाली होती.

ललित यादव (३६) व दर्शन मिसाळ (१२) यांनी पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला शतक गाठता आले, मात्र हे दोन्ही फलंदाज १५ धावांच्या अंतराने माघारी फिरल्यामुळे गोव्याची बाजू खूपच कमकुवत झाली.

संक्षिप्त धावफलक

कर्नाटक, पहिला डाव ः ३७१.

गोवा, पहिला डाव (१ बाद २८ वरुन) ः ७७ षटकांत ६ बाद १७१ (सुयश प्रभुदेसाई १२, अभिनव तेजराणा १८, स्नेहल कवठणकर १०, ललित यादव ३६, दर्शन मिसाळ १२, अर्जुन तेंडुलकर नाबाद ४३, मोहित रेडकर नाबाद २४, विद्वत कावेरप्पा २-३०, अभिलाष शेट्टी ३-६५, यशोवर्धन परणतप १-१८).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT