Bat Ball Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Ranji Cricket: सात वर्षांनी पर्वरीत 'रणजी क्रिकेट' सामना! गोव्याला मणिपूरचे आव्हान; पावसाचा फटका शक्य

Ranji Cricket Match in Porvorim: जीसीए अकादमी मैदानावर तब्बल सात वर्षांनंतर ऑक्टोबर महिन्यात रणजी करंडक क्रिकेट सामना खेळला जाईल. मणिपूरविरुद्धची प्लेट गट चार दिवसीय लढत शुक्रवारपासून या मैदानावर सुरू होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर तब्बल सात वर्षांनंतर ऑक्टोबर महिन्यात रणजी करंडक क्रिकेट सामना खेळला जाईल. मणिपूरविरुद्धची प्लेट गट चार दिवसीय लढत शुक्रवारपासून (ता. ११) या मैदानावर सुरू होईल. राज्यातील परतीच्या पावसामुळे खेळ प्रभावित होण्याचेही संकेत आहेत.

पर्वरीत होणाऱ्या मणिपूरविरुद्धच्या लढतीने गोव्याच्या रणजी करंडक प्लेट मोहिमेस सुरवात होत आहे. पुन्हा एकदा एलिट गटात स्थान मिळविण्यासाठी गोव्यासाठी प्लेट गटातील पाचही सामने महत्त्वाचे आहेत, त्यापैकी तीन सामने घरच्या मैदानावर होतील. प्रतिस्पर्धी तुलनेत कमजोर असल्याने अनुभवी गोव्याची वाटचाल सुकर ठरणे अपेक्षित आहे.

यापूर्वी, २४ ते २७ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत घरच्या मैदानावर (पर्वरीत) गोव्याचा संघ पंजाबविरुद्ध रणजी सामना खेळला होता. ऑक्टोबर महिन्यात गोव्यात झालेला तो अखेरचा सामना होता. वर्षातील दहाव्या महिन्यात पर्वरीत झालेल्या एकूण पाचपैकी तीन रणजी करंडक लढती अनिर्णित राहिल्या आहेत. या लढतींना पावसाचा फटका बसला होता. १ ते ४ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत हैदराबादविरुद्ध झालेली लढत पावसामुळे प्रभावित झाली होती. चार दिवसांतील मिळून एकूण नियोजित ३६० पैकी २४१.४ षटकांचाच खेळ झाल्याने सामना अनिर्णित राहिला होता.

Goa Sports

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT