Pro League 2024 Goa Police Vs Churchill Brothers Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Professional League 2024: गोवा पोलिसांचा विजयी धडाका! चर्चिल ब्रदर्सवर 3-1 ने मात

Professional Football League Goa 2024: गोवा पोलिसांनी प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरीचे प्रदर्शन कायम राखताना रविवारी चर्चिल ब्रदर्सला ३-१ फरकाने हरविले.

गोमन्तक डिजिटल टीम

Professional Football League Goa 2024 Goa Police Vs Churchill Brothers

पणजी: गोवा पोलिसांनी प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरीचे प्रदर्शन कायम राखताना रविवारी चर्चिल ब्रदर्सला ३-१ फरकाने हरविले. रोनाल्डो ऑलिव्हेराच्या दोन गोलमुळे त्यांनी ३-१ फरकाने विजय प्राप्त केला. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

रोनाल्डो ऑलिव्हेरा याने दुसऱ्याच मिनिटास गोवा पोलिसांचे गोलखाते उघडले. नंतर १५व्या मिनिटास अथर्व घाडी याच्या गोलमुळे त्यांची आघाडी वाढली. ६८व्या मिनिटास बिजेश्वर सिंग याने चर्चिल ब्रदर्सची पिछाडी एका गोलने कमी केली, मात्र नंतर रोनाल्डोने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत गोवा पोलिसांना स्पर्धेतील सहावा विजय मिळवून दिला.

त्यांचे आता सात लढतीतून १८ गुण झाले असून अव्वल स्थानी असलेल्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला गाठले आहे. चर्चिल ब्रदर्सचा हा सहावा पराभव ठरला. त्यामुळे सात लढतीनंतर त्यांचे तीन गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT