FC Goa team players | Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: FC Goa ची प्लेऑफ सामन्यांसाठी जय्यत तयारी! काय आहेत उपांत्य फेरीची समीकरणे? वाचा

FC Goa: लीग शिल्ड विजेता मोहन बागान आणि साखळी फेरीतील द्वितीय स्थानावरील एफसी गोवा संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

Sameer Panditrao

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीस २९ मार्चपासून सुरवात होईल. उपांत्य फेरीत परतीचा सामना घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ एफसी गोवास मिळेल. त्यांचा पहिला सामना अवे मैदानावर दोन एप्रिल रोजी, तर होम सामना फातोर्डा येथे सहा एप्रिल रोजी खेळला जाईल.

लीग शिल्ड विजेता मोहन बागान आणि साखळी फेरीतील द्वितीय स्थानावरील एफसी गोवा संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. आयएसएल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीतील बाद फेरी लढती २९ व ३० मार्च रोजी साखळी फेरीतील अनुक्रमे तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकावरील संघांत खेळल्या जातील. २९ रोजी बंगळूर एफसी व मुंबई सिटी एफसी यांच्यात, तर ३० रोजी नॉर्थईस्ट युनायटेड व जमशेदपूर एफसी यांच्यात सामना होईल.

उपांत्य फेरी द्विसाखळी पद्धतीने खेळली जाईल. या फेरीतील सामने अनुक्रमे दोन, तीन, सहा व सात एप्रिल रोजी खेळले जातील. आयएसएल करंडक अंतिम सामना १२ एप्रिल रोजी खेळला जाईल. उपांत्य फेरीत एफसी गोवा संघासमोर बंगळूर एफसी व मुंबई सिटी यांच्यातील विजेत्या संघाचे, तर मोहन बागानसमोर नॉर्थईस्ट युनायटेड व जमशेदपूर एफसी यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल.

प्ले-ऑफ फेरीत प्रतिस्पर्धी संघांनी समान गोल नोंदविले, तर निकालासाठी अतिरिक्त वेळेचा अवलंब होईल. तेथेही बरोबरी झाल्यास पेनल्टी शूटआऊटवर निकाल लागेल.

आयएसएल स्पर्धेच्या साखळी फेरीत मोहन बागानने सलग दुसऱ्यांदा अव्वल क्रमांक मिळविताना शिल्डचा मान मिळविला. एफसी गोवा संघ द्वितीय स्थानी राहिला, तर बंगळूर एफसी (तिसरा क्रमांक), नॉर्थईस्ट युनायटेड (चौथा क्रमांक), जमशेदपूर एफसी (पाचवा क्रमांक) व मुंबई सिटी एफसी (सहावा क्रमांक) यांनी प्ले-ऑफ फेरीतील जागा पक्की केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT