Jay Gupta, Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa समोर आता केरळा ब्लास्टर्सचे आव्हान! गोव्याचा बचावपटूने सामन्याआधी केले मोठे विधान

ISL 2024-25: कोचीतील स्टेडियमवरील गर्दीसमोर खेळताना आम्हाला अजिबात दबाव वाटत नसून त्यांच्यासमोर खेळण्यास खूप आवडते, अशी प्रतिक्रिया कोची येथे रवाना होण्यापूर्वी एफसी गोवाचा बचावपटू जय गुप्ता याने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

ISL 2024-25 Kerala Blasters Vs FC Goa Football Match

पणजी: कोची येथे केरळा ब्लास्टर्स संघाला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात यजमान चाहत्यांचा मोठा उत्स्फूर्त पाठिंबा लाभतो. त्यांच्याविरुद्ध अशा वातावरणात एफसी गोवा संघ खेळणार आहे.

कोचीतील स्टेडियमवरील गर्दीसमोर खेळताना आम्हाला अजिबात दबाव वाटत नसून त्यांच्यासमोर खेळण्यास खूप आवडते, अशी प्रतिक्रिया कोची येथे रवाना होण्यापूर्वी एफसी गोवाचा बचावपटू जय गुप्ता याने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या लढतीत आम्हाला स्टेडियमवरील गर्दीचा नव्हे, तर तेथील हवामानातील आर्द्रतेची जास्त चिंता आहे, असे २३ वर्षीय बचावपटूने नमूद केले. त्याचवेळी आपल्या संघाने केरळमधील हवामानाशी साधर्म्य असलेल्या गोव्यातील हवामानात सराव केल्याचा फायदाही होऊ शकतो, असे मत जय याने व्यक्त केले.

आमची तयारी खरोखरच चांगली झाली असून आम्ही तेथून नक्कीच चांगल्या निकालासह माघारी फिरू. स्पर्धा खंडित होण्यापूर्वीची मागील कामगिरी आम्ही पुढे नेऊ, असा आत्मविश्वास त्याने प्रकट केला.

भारताच्या आंतरराष्ट्रीय सामन्यामुळे आयएसएल स्पर्धा खंडित झाली होती. स्पर्धेला आता पुन्हा सुरवात झाली असून एफसी गोवा संघ गुरुवारी मोहिमेस पुन्हा पुढे सुरवात करेल. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने मागील दोन्ही सामने जिंकले असून त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. सध्या त्यांचे आठ लढतीतून १२ गुण झाले आहेत. केरळा ब्लास्टर्स संघ नऊ सामने खेळला असून त्यांच्या खाती ११ गुण आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT