Manolo Marquez | FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: 'एफसी गोवा'समोर पुन्हा 'मुंबई सिटी'चे आव्हान! प्रशिक्षक मार्केझ विजयाबाबत आशावादी

ISL 2024-25: गतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीतील मुंबई सिटीविरुद्धच्या कटू स्मृतींना तिलांजली देत आता एफसी गोवा संघ चोख प्रत्युत्तरासाठी सज्ज झाला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Super League Football Match FC Goa Vs Mumbai City FC

पणजी: गतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीतील मुंबई सिटीविरुद्धच्या कटू स्मृतींना तिलांजली देत आता एफसी गोवा संघ चोख प्रत्युत्तरासाठी सज्ज झाला आहे. या लढतीपूर्वी चांगल्या कामगिरीचा आशावाद मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी व्यक्त केला.

एफसी गोवा आणि मुंबई सिटी यांच्यातील सामना शनिवारी (ता. १९) संध्याकाळी पाच वाजता फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानावरील गतमोसमातील मुंबई सिटीविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतर यंदा एफसी गोवास जमशेदपूर एफसीकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला, तर नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध ३-३ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. फातोर्ड्यात ते सलग तीन सामने विजयाविना आहेत.

‘‘मुंबई सिटीविरुद्ध आम्ही वचपा काढण्याच्या उद्देशाने उतरणार नाही. आम्ही एका बलवान संघाला सामोरे जाणार आहोत. त्यांचा संघ चांगला आहे, त्यांच्यापाशी गोल करणारे खेळाडू आहेत. पण मी खात्रीने सांगतो, की आमचा संघही तुल्यबळ खेळ करणार असल्याने त्यांच्यासाठी आम्ही कठीण प्रतिस्पर्धी ठरणार आहोत,’’ असे मार्केझ शुक्रवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

बचावात्मक पातळीवर काही त्रुटी असून त्या सुधारण्यावर एफसी गोवाने भर दिलेला आहे, असे नमूद करून मुंबई सिटीलाही बचावात समस्य़ा भेडसावत असल्याचे मार्केझ यांनी नमूद केले. पेत्र क्रॅटकी यांच्या मार्गदर्शनाखाली गतमोसमात आयएसएल करंडक जिंकलेल्या मुंबई सिटीने यंदा विजय नोंदविलेला नाही. त्यांच्या खाती फक्त दोन गुण असले, तरी त्यांना कमी लेखता येणार नाही. बंगळूर एफसीविरुद्धच्या बरोबरीत त्यांनी सरस खेळ केला होता, असे निरीक्षण मार्केझ यांनी नोंदविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT