ISL 2024-25 Canva
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: 'FC Goa' विजयाचे खाते उघडणार का? 'ईस्ट बंगाल'विरुद्ध आज प्रतिष्ठा पणास

FC Goa: आयएसएल स्पर्धेत गतमोसमाच्या अखेरीस दोन व यंदा सुरवातीस दोन मिळून सलग चार सामने एफसी गोवा विजयाविना आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Super League 2024-25

पणजी: एफसी गोवा संघ सध्या चांगले फुटबॉल खेळत नसून सांघिक पातळीवर असमतोल असल्याची कबुली खुद्द मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर सामना जिंकण्याचा दबाव असून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दोन्ही सामने गमावलेल्या ईस्ट बंगालविरुद्ध प्रतिष्ठा पणास लागेल.

कोलकता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर ईस्ट बंगाल व एफसी गोवा यांच्यातील सामना खेळला जाईल. कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालला अनुक्रमे बंगळूर एफसी व केरळा ब्लास्टर्सविरुद्ध अवे मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला, पण पराभूत होण्यापूर्वी त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच झुंजविले होते. त्यामुळे एफसी गोवाची डोकेदुखी वाढली आहे.

एफसी गोवाचा दोन लढतीतून फक्त एक गुण असून मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध खराब खेळल्यानंतर भरपाई वेळेतील गोलमुळे एफसी गोवा संघाला गुणखाते उघडता आले. घरच्या मैदानावर ईस्ट बंगाल संघ विजयाच्या पूर्ण तीन गुणांसाठी नेटाने खेळणार हे स्पष्ट आहे.

सलग चार सामने विजयाविना

आयएसएल स्पर्धेत गतमोसमाच्या अखेरीस दोन व यंदा सुरवातीस दोन मिळून सलग चार सामने एफसी गोवा विजयाविना आहे. आपणास आकडेवारीत स्वारस्य नसल्याचे मार्केझ यांचे म्हणणे असले, तरी ते फक्त एका गुणाच्या कमाईमुळे सध्या निश्चितच चिंतित आहेत.

मैदानात उतरण्यापूर्वी...

यंदा आयएसएल स्पर्धेत एक बरोबरी व एका पराभवामुळे एफसी गोवाचा फक्त एक गुण

ईस्ट बंगालचा दोन्ही अवे लढतीत पराभव, घरच्या मैदानावर शुक्रवारी पहिलाच सामना

गतमोसमात एफसी गोवा भुवनेश्वर येथे २-१, तर फातोर्डा येथे १-० फरकाने ईस्ट बंगालविरुद्ध विजयी

ईस्ट बंगालविरुद्ध आयएसएलमध्ये एफसी गोवाचे सलग चार विजय

एकंदरीत आठ आयएसएल लढतीत एफसी गोवाचे पाच, ईस्ट बंगालचा एक विजय, दोन बरोबरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT