FC Goa Vs Mohun Bagan Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: "विजय हीच संघाची मानसिकता"; FC Goa विरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रशिक्षक होजेंचे मोठे विधान

FC Goa Vs Mohun Bagan: मोहन बागान व एफसी गोवा यांच्यात आयएसएल स्पर्धेच्या गुणतक्त्यात सध्या सात गुणांचा फरक आहे. मोहन बागानचे ११ सामन्यांतून २६ गुण असून ते अग्रस्थानी आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

ISL 2024-25 FC Goa Vs Mohun Bagan

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील दोन तगडे संघ एफसी गोवा आणि गतवेळचा शिल्ड विजेता कोलकत्यातील मोहन बागान फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झुंजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उभय संघांच्या मुख्य प्रशिक्षकांनी पूर्ण तीन गुणांचेच लक्ष्य जाहीर केले.

सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘मोहन बागान संघ सध्या प्रशिक्षक होजे मोलिना यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले फुटबॉल खेळत आहे. त्यांनी संघाचे योग्य व्यवस्थापन केले आहे. हा संघ शिल्डसाठी दावेदार आहे. त्याचवेळी आमचा संघही प्रेरित आहे. एकंदरीत दोन्ही संघांसाठी सामना खडतर असेल. आमची नजर निश्चितच विजयावर केंद्रित आहे.’’

त्यापूर्वी, मोहन बागानचे प्रशिक्षक होजे मोलिना यांनी सांगितले, की ‘‘आमच्या संघात केवळ अकराच नव्हे, तर सारेच खेळाडू चांगले खेळत आहेत. विजय हीच संघाची मानसिकता आहे. आव्हानासाठी आम्ही सज्ज असून शेवटपर्यंत झुंज देऊ.’’

मोहन बागान व एफसी गोवा यांच्यात आयएसएल स्पर्धेच्या गुणतक्त्यात सध्या सात गुणांचा फरक आहे. आठ विजय, दोन बरोबरी व एका पराभवासह मोहन बागानचे ११ सामन्यांतून २६ गुण असून ते अग्रस्थानी आहेत, तर एफसी गोवाने पाच विजय, चार बरोबरी व दोन पराभवांसह ११ सामन्यांतून १९ गुण नोंदविले असून ते सध्या चौथ्या क्रमांकावर आहेत.

मोहन बागान संघ सात विजय व एक बरोबरी मिळून सलग आठ सामने अपराजित असून त्यांनी ओळीने चार विजय नोंदविले आहेत. मागील लढतीत केरळा ब्लास्टर्सला पिछाडीवरून ३-२ असे पराभूत केले होते. एफसी गोवा संघ सहा सामने अपराजित आहे, यामध्ये चार विजय व दोन बरोबरींचा समावेश आहे. अगोदरच्या लढतीत त्यांनी बंगळूर एफसीविरुद्ध २-२ अशी गोलबरोबरी साधली होती.

मैदानावर उतरण्यापूर्वी...

आयएसएल स्पर्धेतील ८ लढतीत मोहन बागानचे ५, एफसी गोवाचे २ विजय, १ बरोबरी

गतमोसमात (२०२३-२४) कोलकता येथे एफसी गोवा ४-१, तर फातोर्ड्यात मोहन बागान १-० फरकाने विजयी

फातोर्डा येथे मोहन बागानचे ४ सामन्यांत २ विजय, १ पराभव, १ बरोबरी

यंदा फातोर्डा येथे घरच्या मैदानावर एफसी गोवाचे ५ सामन्यांत २ विजय, २ पराभव, १ बरोबरी

यंदा मोहन बागानच्या ६, तर एफसी गोवाच्या ३ क्लीन शीट्स

स्पर्धेत यावेळी मोहन बागानचे २२, तर एफसी गोवाचे २१ गोल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT