FC Goa  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Indian Super League: घरच्या मैदानावर केरळा ब्लास्टर्स दाखवणार का जलवा? अपराजित एफसी गोव्याचं कडवं आव्हान

Kerala Blasters Vs FC Goa: केरळा ब्लास्टर्स व एफसी गोवा यांच्यातील सामना गुरुवारी (ता. २८) कोची येथे खेळला जाईल. निराशाजनक सुरवातीनंतर मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आता सावरला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कोची येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हजारोंच्या संख्येने केरळा ब्लास्टर्सला प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांसमोर विजय नोंदविणे सोपे नाही, तरीही मागील तीन सामने अपराजित असलेला एफसी गोवा संघ पूर्ण गुणांसह माघारी येण्यास इच्छुक असेल.

केरळा ब्लास्टर्स व एफसी गोवा (FC Goa) यांच्यातील सामना गुरुवारी (ता. २८) कोची येथे खेळला जाईल. निराशाजनक सुरवातीनंतर मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आता सावरला आहे. मागील तीन लढतीत त्यांनी अनुक्रमे बरोबरी व दोन विजय नोंदविले आहेत.

या पार्श्वभूमीवर आपला संघ चांगले फुटबॉल खेळत असून यावेळचा मोसमच निश्चितच आश्वासक ठरण्याचा विश्वास मार्केझ यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. एफसी गोवाने आठ लढतीत तीन विजय, तीन बरोबरी व दोन पराभवांसह १२ गुण नोंदविले आहेत. गुरुवारी आणखी एक विजय नोंदविल्यास त्यांची गुणतक्त्यातील कामगिरी सुधारेल.

मिकाईल स्टाहरे यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सची यावेळची कामगिरी उल्लेखनीय नाही, तरीही घरच्या मैदानावर त्यांचे पारडे नेहमीच वरचढ असते. स्पर्धेत सलग तीन सामने गमावल्यानंतर मागील लढतीत त्यांनी पूर्ण तीन गुण प्राप्त केले. त्या आत्मविश्वासाच्या बळावर एफसी गोवाविरुद्ध मोठ्या संख्येने स्टेडियमवर येणाऱ्या चाहत्यांना खूश करण्यासाठी केरळा ब्लास्टर्स संघ प्रयत्नशील राहील. सलग सहा सामन्यांत गोल केलेला स्पॅनिश खेळाडू हेझूस हिमेनेझ याचा धोका एफसी गोवासमोर असेल. त्यांचे नऊ सामन्यांत तीन विजय, दोन बरोबरी व चार पराभवांसह ११ गुण झाले आहेत.

संघातील खेळाडू मोठ्या गर्दीसमोर खेळण्यास सज्ज असून सर्व खेळाडूंना पुरेशी संधी देण्यावर आपला भर असल्याचे मार्केझ यांनी सांगितले. स्पर्धेत आठ गोल केलेला अल्बेनियाचा आर्मांदो सादिकू, तसेच पंजाब एफसीविरुद्ध सामनावीर ठरलेला स्पॅनिश इकेर ग्वॉर्रोचेना यांच्यावर गोव्यातील संघ आक्रमणात अवलंबून असेल. पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे रॉलिन बोर्जिस, मुहम्मद नेमिल, लक्ष्मीकांत कट्टीमणी केरळा ब्लास्टर्सविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी असून आकाश संगवान तंदुरुस्त असल्याची माहिती मार्केझ यांनी दिली

मैदानात उतरण्यापूर्वी...

आयएसएल स्पर्धेतील २० सामन्यांत एफसी गोवाचे ११, तर केरळा ब्लास्टर्सचे ५ विजय, ४ सामने बरोबरीत

कोची येथे १० लढतीत केरळा ब्लास्टर्सचे ४, एफसी गोवाचे ३ विजय, तर ३ बरोबरी

गतमोसमात फातोर्डा येथे एफसी गोवा १-० फरकाने विजयी, कोची येथे केरळा ब्लास्टर्सची ४-२ फरकाने बाजी

यंदा स्पर्धेत एफसी गोवाचे १६, तर केरळा ब्लास्टर्सचे १५ गोल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: नोकरी सरकारी, थाट 'लक्झरी'! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार 'बंपर' वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब पालटणार

VIDEO: अरेरे! रेड कार्पेटवर पाकिस्तानी उपपंतप्रधान तोंडावर पडले, सुरक्षारक्षकांनी कसंबसं सावरलं; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Viral Video: हत्तीने कारला खेळण्यासारखं हवेत उडवलं, ड्रायव्हर थोडक्यात बचावला; व्हिडिओ पाहून भरेल धडकी

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन अटकेत, रचला होता मोठा कट

Viral Post: "शेर कभी शिकार करना नहीं भूलता!" रोहितच्या वादळी खेळीवर युवीची प्रतिक्रिया; पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT