FC Goa team players | Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: एफसी गोवासमोर बलाढ्य मोहन बागानचे आव्हान; तिसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याची संधी

FC Goa VS Mohan Bagan: मोहन बागानने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या फक्त एकच सामना गमावला असून कोलकत्यातील बलाढ्य संघ सध्या अव्वल स्थानी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

ISL 2024-25 FC Goa VS Mohan Bagan Football Match

पणजी: मोहन बागानने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या फक्त एकच सामना गमावला असून कोलकत्यातील बलाढ्य संघ सध्या अव्वल स्थानी आहे. त्यांना पराभूत करण्याची किमया एफसी गोवाने शुक्रवारी (ता. २०) साधल्यास ते गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधतील. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.

सध्या मोहन बागानचे २६, बंगळूर एफसीचे २४, तर ओडिशा व एफसी गोवाचे प्रत्येकी १९ गुण आहेत. मोनोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघ मागील सहा सामने अपराजित असून यामध्ये चार विजय व दोन बरोबरींचा समावेश आहे.

मोहन बागानने ११ पैकी सहा सामन्यांत क्लीन शीट राखली आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गोल नोंदविणे एफसी गोवासाठी सोपे नसेल. मोहन बागानने ११ पैकी आठ सामने जिंकले असून तेवढेच सामने खेळलेल्या एफसी गोवाने पाच विजय नोंदविले आहेत.

दोन्ही संघांनी आक्रमणात चमक दाखविली आहे. मोहन बागानने २२, तर एफसी गोवाने २१ गोल नोंदविले आहेत. मागील १० आयएसएल सामन्यांत मोहन बागानने सहा, तर एफसी गोवाने तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे कोलकत्यातील संघ गोव्यात वर्चस्व राखण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT