shubman gill Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs ENG 2nd Test: दमदार पुनरागमनासाठी 'गिल सेना' सज्ज! दुसऱ्या कसोटीत पाऊस ठरणार अडथळा? जाणून घ्या पाच दिवस कसे असेल हवामान

IND vs ENG 2nd Test Weather Report: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्यापासून (2 जुलै) बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळला जाणार आहे.

Manish Jadhav

IND vs ENG 2nd Test Weather Report: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्यापासून (2 जुलै) बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळला जाणार आहे. इंग्लंड क्रिकेट संघाने लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दमदार पुनरागमनाचे वेध लागले आहेत. त्याआगोदर, दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी एजबॅस्टनमध्ये पुढील पाच दिवस हवामान कसे असणार याबाबत जाणून घेऊया..

पाच दिवस हवामान कसे असणार?

खरं तर, लीड्स कसोटीत भारतीय संघाने दोन्ही डावात 800 धावा केल्या होत्या, परंतु तरीही, खराब क्षेत्ररक्षण आणि खालच्या फळीतील फलंदाजांच्या सुरुवातीच्या विकेट्समुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने (England) पाचव्या दिवशी 371 धावांचे लक्ष्य सहज गाठले. आता दुसरा कसोटी सामना 2 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. एजबॅस्टन येथे खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात पाऊस खेळ खराब करु शकतो. एजबॅस्टन कसोटीत पहिल्या तीन दिवसांत पावसाची शक्यता कमी आहे, तर शेवटच्या दोन दिवसांत पावसाची शक्यता जास्त आहे. पाचव्या दिवशी वातावरण ढगाळ असून गोलंदाजांना याचा फायदा मिळेल.

Edgbaston Weather Report

पहिला दिवस (2 जुलै) - 10 अंश ते 21 अंश सेल्सिअस - पावसाची 24 टक्के शक्यता

दुसरा दिवस (4 जुलै) - 14 अंश ते 23 अंश सेल्सिअस - पावसाची 3 टक्के शक्यता

तिसरा दिवस (5 जुलै) - 14 अंश ते 23 अंश सेल्सिअस - पावसाची 4 टक्के शक्यता

चौथा दिवस (5 जुलै) - 14 अंश ते 23 अंश सेल्सिअस - पावसाची 38 टक्के शक्यता

पाचवा दिवस (6 जुलै) - 11 अंश ते 19 अंश सेल्सिअस - पावसाची 41 टक्के शक्यता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT