Goa Football News Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: स्पोर्टिंग क्लब, डायमंड हार्बर सामना सुटला बरोबरीत! दोन्ही संघांच्या खात्यात 1 गुण; 'डायमंड' अग्रस्थानी कायम

Sporting Club Vs Diamond Harbor: स्पोर्टिंग गोवाच्या जॉयनर लॉरेन्सच्या स्वयंगोलमुळे डायमंड हार्बरला ११व्या मिनिटास आघाडी मिळाली.

Sameer Panditrao

I League Sporting Club Vs Diamond Harbor

पणजी: आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थानी असलेल्या पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर एफसीला स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने गुरुवारी १-१ असे गोलबरोबरीत रोखले. सामना बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला.

सामन्यातील दोन्ही गोल पूर्वार्धातील खेळात झाले. स्पोर्टिंग गोवाच्या जॉयनर लॉरेन्सच्या स्वयंगोलमुळे डायमंड हार्बरला ११व्या मिनिटास आघाडी मिळाली. पिछाडी यजमान संघाने लगेच भरून काढली. कर्णधार दत्तराज गावकर याने २८व्या मिनिटास बरोबरीचा गोल केला.

कुणाल कुंडईकर याच्या क्रॉस पासवर हा गोल झाला. सामन्यातील अखेरची १८ मिनिटे डायमंड हार्बर संघाला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यांच्या रोबिलाल मंडी याला ७२व्या मिनिटास सामन्यातील दुसरे यलो कार्ड दाखविण्यात आले. बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. डायमंड हार्बरची ही दहा सामन्यांतील तिसरी बरोबरी ठरली. २४ गुणांसह त्यांचे

अग्रस्थान कायम राहिले. दुसऱ्या क्रमांकावरील चानमारी एफसीचे २२ गुण आहेत. स्पोर्टिंग गोवाने चौथी बरोबरी नोंदविली. ११ सामन्यांतून त्यांचे १९ गुण झाले असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. स्पर्धेतील अन्य एका लढतीत इंफाळ येथे एफसी बंगळूर युनायटेडने नेरोका एफसीवर २-० फरकाने मात केली. बंगळूर युनायटेडचे आता ११ सामन्यांतून १७ गुण झाले असून ते चौथ्या स्थानी असून नेरोका एफसी ११ गुणांसह सातव्या क्रमांकावर राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT