Football Canva
गोंयचें खेळामळ

I League: धेंपो क्लबचा दणदणीत विजय! स्पोर्टिंग क्लब बंगळूरचा 8-1 फरकाने उडवला धुव्वा; जोसेफची हॅटट्रिक

Dempo Club Vs Sporting Club Bangalore: धेंपो क्लबने स्पर्धेतील एकंदरीत सहावा विजय नोंदविला. त्यांचे आता १८ सामन्यांतून २२ गुण झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

I League Dempo Club Vs Sporting Club Bangalore

पणजी: धेंपो स्पोर्टस क्लबने आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील स्थान राखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विजय नोंदविताना शनिवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जबरदस्त गोल धडाका प्रदर्शित केला. त्यांनी स्पोर्टिंग क्लब बंगळूरचा ८-१ फरकाने धुव्वा उडविला, त्यात मार्कुस जोसेफने हॅटट्रिक साधली.

धेंपो क्लबने स्पर्धेतील एकंदरीत सहावा विजय नोंदविला. त्यांचे आता १८ सामन्यांतून २२ गुण झाले. ते नवव्या क्रमांकावर आहेत. स्पोर्टिंग क्लब बंगळूरला नववा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे १८ लढतीनंतर त्यांचे १७ गुण व दहावा क्रमांक कायम राहिला. त्यांच्या बचावफळीची कामगिरी शनिवारी अतिशय गचाळ ठरली.

धेंपो क्लबच्या एकतर्फी विजयात त्रिनिदादच्या जोसेफ याने अनुक्रमे आठव्या, नवव्या व ४३व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. सेईगौमांग डौंगेल याने १६व्या, स्पॅनिश हुआन मेरा याने ४९व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर, अर्जेंटिनाचा दामियन पेरेझ याने ७७व्या, बदली खेळाडू कपिल होबळे याने ८७व्या, तर नायजेरियन लुकमन अबेगुनरिन याने ८८व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. युगांडातील हेन्री किएस्का याने २३व्या मिनिटास स्पोर्टिंग क्लब बंगळूरचा एकमात्र गोल नोंदविला. बंगळूरमधील संघाला अखेरची सहा मिनिटे दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यांच्या शानिद वालन याला ८४व्या मिनिटास रेड कार्ड मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT