Goa Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Hazare Trophy: फलंदाजांनी केली घोर निराशा! बलाढ्य गुजरातसमोर गोव्याची शरणागती; सहा विकेट्स आणि 199 चेंडू राखून पराभव

Gujarat Defeated Goa: विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेतील लढतीत शुक्रवारी गोव्याने बलाढ्य गुजरातसमोर सपशेल शरणागती पत्करली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेतील लढतीत शुक्रवारी गोव्याने बलाढ्य गुजरातसमोर सपशेल शरणागती पत्करली. त्यांना सहा विकेट आणि १९९ चेंडू राखून मोठा पराभव पत्करावा लागला.

जयपूर येथील के. एल. सैनी स्टेडियमवर झालेल्या लढतीत गुजरातने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. मागील लढतीत आसामला नमवलेल्या गोव्याच्या संघाने साफ अपेक्षाभंग केला. अक्षर पटेल (३-१४), रवी बिष्णोई (२-८), अरझान नागवसवाला (२-३०) यांच्या प्रभावी माऱ्यासमोर गोव्याचा डाव अवघ्या ११७ धावांत गारद झाला. स्पर्धेच्या अ गटात सलग सहावा सामना जिंकलेल्या गुजरातने ११८ धावांचे लक्ष्य चार विकेट गमावून अवघ्या १६.५ षटकांतच गाठले. गोव्याचा (Goa) हा सहा सामन्यांतील तिसरा पराभव ठरला.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः ३५.४ षटकांत सर्वबाद ११७ (ईशान गडेकर १, स्नेहल कवठणकर २९, के. व्ही. सिद्धार्थ ४३, दीपराज गावकर ४, सुयश प्रभुदेसाई ५, विकास सिंग ४, दर्शन मिसाळ १०, मोहित रेडकर ५, फेलिक्स आलेमाव ३, अमूल्य पांड्रेकर नाबाद ०, शुभम तारी ०, चिंतन गजा ६-१-२०-१, अरझान नागवसवाला ७-०-३०-२, हेमांग पटेल ६-०-२५-१, प्रियजितसिंग जडेजा ६-०-१९-१, अक्षर पटेल ६.४-१-१४-३, रवी विष्णोई ४-१-८-२) पराभूत वि. गुजरात ः १६.५ षटकांत ४ बाद ११८ (आर्य देसाई १६, ऊर्विल पटेल ६१, उमंग कुमार २४, शुभम तारी ४.३-०-२७-१, मोहित रेडकर २-०-१६-०, फेलिक्स आलेमाव ६-०-४९-२, दीपराज गावकर ०.३-०-०-०, अमूल्य पांड्रेकर ३-०-२४-१, सुयश प्रभुदेसाई ०.५-०-२-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT