Chetan Salgaonkarkhelo India Medal Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Khelo India Para Games: गोव्याच्या 'चेतन'ने गाजवली दिल्ली! पॅरा टेबल टेनिसमध्ये सलग दुसऱ्या वर्षी जिंकले ब्रॉन्झ

Chetan Salgaonkar: गोव्याचा दिव्यांग टेबल टेनिसपटू चेतन साळगावकर याने सलग दुसऱ्यांदा खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये टेबल टेनिसमध्ये पदक जिंकण्याची किमया साधली. पु

Sameer Panditrao

पणजी: गोव्याचा दिव्यांग टेबल टेनिसपटू चेतन साळगावकर याने सलग दुसऱ्यांदा खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये टेबल टेनिसमध्ये पदक जिंकण्याची किमया साधली. पुरुष एकेरीतील एस-९ प्रकारात तो ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.

नवी दिल्ली येथे दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स सुरू आहे. कोलवाळ येथील चेतन याने २०२३ साली झालेल्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्येही टेबल टेनिसमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. चेतन याने दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेतही ब्राँझपदकाची कमाई केली होती.

खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये गोव्याला यंदा एकूण दोन पदके (प्रत्येकी एक सुवर्ण व ब्राँझ) मिळाली. ॲथलेटिक्समध्ये साक्षी काळे हिने महिलांच्या टी-१३ प्रकारात १०० मीटर शर्यतीत१४.४७ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले होते.

दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये गोव्याने ॲथलेटिक्स व टेबल टेनिसमध्ये भाग घेतला होता, दोन्ही खेळांत गोव्याला पदके मिळाली. क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाचे उपसंचालक विवेक पवार यांनी नवी दिल्लीतील स्पर्धेत गोव्याचे चेफ द मिशन या नात्याने जबाबदारी सांभाळली. त्यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT