goa vs haryana Canva
गोंयचें खेळामळ

Cooch Behar Trophy: फलंदाजांनी दगा दिला पण गोलंदाजांनी सावरलं; हरियानाविरुद्ध गोव्याला राखता आलं आव्हान!

Goa vs Haryana Cricket Match: हरियानातील लाहली येथील चौधरी बन्सीलाल क्रिकेट स्टेडियमवर ‘क’ गट सामन्याला बुधवारपासून सुरवात झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याला पुन्हा एकदा फलंदाजांनी दगा दिला, मात्र हरियानाविरुद्धच्या चार दिवसीय लढतीच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांनी चमक दाखविल्यामुळे आव्हान कायम राखता आले.

हरियानातील लाहली येथील चौधरी बन्सीलाल क्रिकेट स्टेडियमवर ‘क’ गट सामन्याला बुधवारपासून सुरवात झाली. तमिळनाडूविरुद्ध मागील लढतीत दुसऱ्या डावात ८४ धावांत गारद झालेल्या गोव्याच्या (Goa) फलंदाजांनी हरियानाविरुद्धही पहिल्या डावात साफ निराशा केली.

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर त्यांचा डाव ८८ धावांत संपुष्टात आला. नंतर हरियानाच्या (Haryana) पहिल्या डावात नील नेत्रावळकर याने तीन धक्के दिल्यामुळे यजमान संघाची दिवसअखेर ५ बाद १३३ अशी स्थिती असून त्यांच्यापाशी ४५ धावांची आघाडी जमा झाली आहे.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: ४३.२ षटकांत सर्वबाद ८८ (आदित्य कोटा १३, चिगुरुपती व्यंकट ०, दिशांक मिस्कीन २७, यश कसवणकर ०, निसर्ग नागवेकर २०, जीवनकुमार चित्तेम ०, पुंडलिक नाईक ९, शमिक कामत १०, अनुज यादव १, समर्थ राणे नाबाद ०, नील नेत्रावळकर ०, विष्णू चौधरी ३-२२, कनिष्क चौहान ५-१५, सुम्मी कादियान २-२४).

हरियाना, पहिला डाव: ४७ षटकांत ५ बाद १३३ (अझल सिवाच ४२, लक्षय नगर १७, सुखलीन सिंग २७, मोक्ष मुदगिल ११, रुद्राक्ष नरवाल नाबाद २४, पुंडलिक नाईक ३-०-१४-०, यश कसवणकर १४-१-४३-१, समर्थ राणे १-०-६-०, अनुज यादव १५-५-३७-१, नील नेत्रावळकर १४-३-३१-३).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT