Professional League 2024 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Professional League 2024: जीनो एफसी अव्वल स्थानी! पणजी फुटबॉलर्सचा ५-१ फरकाने धुव्वा

Goa Professional Football League 2024: जीनो एफसीने सलग तिसऱ्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवून गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले. म्हापसा येथील घुळेर स्टेडियमवर त्यांनी पणजी फुटबॉलर्सचा ५-१ फरकाने धुव्वा उडविला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जीनो एफसीने सलग तिसऱ्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवून गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले. शनिवारी म्हापसा येथील घुळेर स्टेडियमवर त्यांनी पणजी फुटबॉलर्सचा ५-१ फरकाने धुव्वा उडविला.

जीनो एफसीच्या विजयात फ्रँकी ऑलिव्हेरा (१९वे मिनिट), इराकांत सिंग (३२ वे मिनिट), फ्लॅन गोम्स (४५+२ वे मिनिट), महंमद रफी (७२वे मिनिट) व बदली खेळाडू कृष्णा गावस (८१वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पणजी फुटबॉलर्ससाठी एकमात्र गोल पूर्वार्धातील खेळात ३९व्या मिनिटास अजय राज याने नोंदविला.

जीनो एफसीचे आता चार लढतीनंतर तीन विजय व एका बरोबरीसह सर्वाधिक १० गुण झाले आहेत. पणजी फुटबॉलर्सला सलग चौथा पराभव पत्करावा लागला.

जीनो एफसीला आघाडी मिळवून देताना फ्रँकी याने व्हेलिटो क्रूझ याच्या असिस्टवर प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकविले. अर्ध्या तासाच्या खेळानंतर लेन्सस्टन आफोन्सोचे दूरवरून दिलेल्या शानदार पासवर इराकांतने पुढील काम चोख बजावले. पणजी फुटबॉलर्सचे आव्हान कायम राखताना अजय याने व्हेरॉन परेराच्या फ्रीकिकवर पिछाडी कमी करणारा गोला केला.

पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत फ्रँकी ऑलिव्हेराच्या असिस्टवर फ्लॅन गोम्स याने जीनो एफसीचा आघाडी ३-१ अशी भक्कम केली. उत्तरार्धातील खेळात नीरज पारेखच्या कॉर्नर फटक्यावर रफी याने गोल केल्यानंतर सामना संपण्यास नऊ मिनिटे बाकी असताना प्रजत नाईकच्या पासवर कृष्णा याने जीनो एफसीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT