Professional League 2024 Canva
गोंयचें खेळामळ

Professional League: चुरशीच्या लढतीत FC Goaचा पराभव! कुठ्ठाळी व्हिलेजर्सने दिली 3-2 अशी मात

Goa Professional Football League 2024: प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील चुरशीच्या लढतीत कुठ्ठाळी व्हिलेजर्सने एफसी गोवा संघावर ३-२ अशी निसटती मात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Professional Football League 2024 Cortalim Villagers Vs FC Goa

पणजी: प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील चुरशीच्या लढतीत कुठ्ठाळी व्हिलेजर्सने एफसी गोवा संघावर ३-२ अशी निसटती मात केली. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर बुधवारी झालेल्या या लढतीत एफसी गोवास ४९व्या मिनिटापासून दहा खेळाडूंसह खेळावे लागले.

विश्रांतीनंतर खेळ सुरू झाल्यानंतर चौथ्या मिनिटास चेंडू हाताळल्याबद्दल मल्लिकजान कालेगर याला दुसऱ्या यलोसह रेड कार्ड मिळाले आणि एफसी गोवाचा एक खेळाडू कमी झाला. यावेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर सिडनी लुकास याने ५०व्या मिनिटास कुठ्ठाळी व्हिलेजर्सला आघाडी मिळवून दिली.

नंतर अलिस्टर फर्नांडिसने ५२व्या मिनिटास संघाची आघाडी २-० अशी वाढविली. ६७व्या मिनिटास ज्योव्हियल डायसने एफसी गोवाची पिछाडी १-२ अशी कमी केली. ७०व्या मिनिटास बदली खेळाडू प्रथमेश गावकरच्या गोलमुळे कुठ्ठाळी व्हिलेजर्सचे वर्चस्व वाढले.

७९व्या मिनिटास लेम्मेत तांगवा याच्या पेनल्टी गोलमुळे पुन्हा एकदा एफसी गोवाने पिछाडी कमी केली, पण नंतर ते बरोबरी साधू शकले नाहीत.

कुठ्ठाळी व्हिलेजर्सचा हा सात सामन्यांतील दुसरा विजय असून त्यांचे आठ गुण झाले आहेत. एफसी गोवास पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आठ लढतीनंतर त्यांचे नऊ गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT