T20 Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

T20 Cricket: ललित यादवची 81 धावांची झुंज व्यर्थ; बलाढ्य मुंबईकडून गोव्याचा 18 धावांनी पराभव

Goa vs Mumbai T20: नावाजलेल्या क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या बलाढ्य मुंबईविरुद्ध ललित यादव याने जोरदार प्रतिहल्ला चढविताना आक्रमक ८१ धावा केल्या

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: नावाजलेल्या क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या बलाढ्य मुंबईविरुद्ध ललित यादव याने जोरदार प्रतिहल्ला चढविताना आक्रमक ८१ धावा केल्या; पण दीपराज गावकर (४८) वगळता इतर फलंदाज गांगरल्यामुळे गोव्याला १८ धावांनी पराभव पत्करावा लागला.

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ‘ड’ गटातील सामना बुधवारी कोलकता येथील जादवपूर विद्यापीठ कॅम्पस मैदानावर झाला. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २०७ धावा केल्यानंतर गोव्याचा डाव १९ षटकांत १८९ धावांत संपुष्टात आला. गोव्याचा हा सलग तिसरा पराभव ठरला, तर मुंबईने ओळीने तिसरा सामना जिंकला. गोव्याचा पुढील सामना २० रोजी हैदराबादविरुद्ध होईल.

द्विशतकी आव्हान स्वीकारल्यानंतर गोव्याचे तिघे फलंदाज खूपच लवकर बाद झाले. अनुभवी सुयश प्रभुदेसाई सलग तिसऱ्या डावात अपयशी ठरला. बुधवारी तो सहा धावांवर बाद झाला. त्यापूर्वी त्याने अनुक्रमे चार व दहा धावा केल्या होत्या. ३ बाद २३ या धावसंख्येवरून ललितने दीपराजसह चौथ्या विकेटसाठी ४४ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून गोव्याच्या आशा कायम ठेवल्या. दीपराज बाद झाल्यानंतर गोव्याची पुन्हा घसरगुंडी उडाली. दीपराजने ३० चेंडूंचा सामना करताना आठ चौकार व एक षटकार लगावला.

ललितने नंतर वासुकी कौशिक याच्यासमवेत आठव्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केल्यामुळे मुंबईच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. ललितला साईराज पाटील याने बाद केल्यानंतर गोव्याचे आव्हान संपुष्टात आले. ललितने ४१ चेंडूंतील खेळीत १४ चौकार व एक षटकार मारला. साईराजनेच कौशिकला बाद करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या लढतीत शार्दुल ठाकूर याच्या तीन षटकांत ४० धावा वसूल झाल्या; पण त्याला विकेट मिळाली नाही. शिवम दुबेने ४० धावांत २ गडी टिपले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : १८.५ षटकांत सर्वबाद २०७ (मुशीर खान ४४, सूर्यकुमार यादव २५, मॅक्सवेल स्वामिनाथन २८, शिवम दुबे २३, सर्फराज खान १६, साईराज पाटील ४०, फेलिक्स आलेमाव ३-०-४०-२, वासुकी कौशिक ३.५-०-२४-२, शुभम तारी ४-०-५३-२, दीपराज गावकर ४-०-३९-२, विकास सिंग १-०-१५-१, ललित यादव ३-०-३४-१) वि. वि. गोवा : १९ षटकांत सर्वबाद १८९ (अभिनव तेजराणा १४, अझान थोटा १, ललित यादव ८१, सुयश प्रभुदेसाई ६, दीपराज गावकर ४८, शिवेंद्र भुजबळ ३, दर्शन मिसाळ ६, विकास सिंग १०, वासुकी कौशिक ९, शुभम तारी ०, फेलिक्स आलेमाव नाबाद २, तुषार देशपांडे ४-०-४७-२, शिवम दुबे ४-०-४०-२, साईराज पाटील ३-०-२७-३).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E Rickshaw Crash Test Rating Rules: आता ई-रिक्षांनाही मिळणार सेफ्टी स्टार रेटिंग! मोदी सरकारचा मास्टरप्लॅन तयार; लवकरच जाहीर होणार नवे नियम

FC Goa: फातोर्डाऐवजी आता अटल स्टेडियम एफसी गोवाचे नवे 'होम ग्राउंड'; फेब्रुवारीपासून सामने

Goa EDC Limited: रोजगारनिर्मिती आणि उद्योगवाढीवर ईडीसीचा भर; मुख्यमंत्री सावंतांकडून कामकाजाचा आढावा

Birch By Romeo Lane Fire: मृतांच्या कुटुंबीयांना 20 लाखांची मदत; 'बर्च बाय...' क्लबने कोर्टात जमा केला पहिला हप्ता

FDA Raid: गोव्यात 6 हजार किलो चिकन नष्ट; नागरिकांच्या ताटात जाण्याआधीच एफडीएची कारवाई

SCROLL FOR NEXT