Vinavi Gurav captain Goa team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Team Cricket Captain: गोव्याच्या महिला संघासाठी नवी कर्णधार! विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्व; T20 मोहीमेला होणार सुरुवात

Vinavi Gurav: आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शिखा पांडे हिने २०२५-२६ मोसमात गोव्याकडून न खेळण्याचे ठरविल्यानंतर विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) सीनियर महिला संघासाठी नवी कर्णधार नियुक्त केली असून विकेटकीपर-बॅटर विनवी गुरव हिच्या नेतृत्वाखाली संघ येत्या बुधवारपासून (ता. ८) टी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शिखा पांडे हिने २०२५-२६ मोसमात गोव्याकडून न खेळण्याचे ठरविल्यानंतर विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी आली आहे. संघात सुनंदा येत्रेकर, श्रेया परब, संजुला नाईक, पूर्वा भाईडकर, पूर्वजा वेर्लेकर या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. युवा गोलंदाज उस्मा खान व विधी भांडारे यांच्यासाठी स्पर्धा महत्त्वाची असेल.

स्पर्धेतील सामने छत्तीसगडमधील रायपूर येथे खेळले जातील. गोव्याच्या एलिट ‘ड’ गटात उत्तराखंड, झारखंड, चंडीगड, दिल्ली, रेल्वे व आसाम या संघांचा समावेश आहे. माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू दिल्लीच्या नेहा तंवर संघाच्या प्रशिक्षक आहेत.

संघातील खेळाडू ः विनवी गुरव (कर्णधार), पूर्वजा वेर्लेकर, हर्षिता यादव, संजुला नाईक, पूर्वा भाईडकर, तनिशा गायकवाड, सुनंदा येत्रेकर, श्रेया परब, विधी भांडारे, मेताली गवंडर, उस्मा खान, तनया नाईक, हर्षदा कदम, दिव्या नाईक, दीक्षा आमोणकर, अँजेल डिकॉस्ता, पलक आरोंदेकर.

गोव्याचे वेळापत्रक

तारीख ८ ऑक्टोबर - विरुद्ध उत्तराखंड, तारीख ९ ऑक्टोबर - विरुद्ध झारखंड, तारीख ११ ऑक्टोबर - विरुद्ध चंडीगड, तारीख १३ ऑक्टोबर - विरुद्ध दिल्ली, तारीख १७ ऑक्टोबर - विरुद्ध रेल्वे, तारीख १९ ऑक्टोबर - विरुद्ध आसाम.

गतमोसमातील टी-२० कामगिरी

२०२४-२५ मध्ये गोव्याचा सीनियर महिला संघ टी-२० एलिट अ गटात खेळला होता. ७ सामन्यांत त्यांनी ३ विजय नोंदविले, तर ४ लढतीत पराभव पत्करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT