Goa Table Tennis|Goa Challengers Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

UTT League: गोवा चॅलेंजर्स सलग दुसऱ्या वर्षी 'यूटीटी स्पर्धेत' अजिंक्य! भारतीय फ्रँचायजीमध्ये वर्चस्व

Ultimate Table Tennis League: गोवा टेबल टेनिस संघटनेने या यशाने राज्यातील टेबल टेनिस खेळाला ऊर्जितावस्था लाभण्याचा आशावाद व्यक्त केला

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा चॅलेंजर्सने अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) लीग स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावून भारतीय फ्रँचायजी टेबल टेनिसमधील वर्चस्व सिद्ध केले. या यशाने गोवा टेबल टेनिस संघटनेने राज्यातील टेबल टेनिस खेळाला ऊर्जितावस्था लाभण्याचा आशावाद व्यक्त करताना विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

गोव्यातील क्रीडाप्रेमी आणि धेंपो उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यूटीटी विजेत्या गोवा चॅलेंजर्सचे सहमालक आहे. या अनुषंगाने गोवा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष सुदिन वेरेकर यांनी नमूद केले, की ‘‘या विजयाने प्रेरित होऊन गोवा टेबल टेनिस संघटना राज्यात यूटीटीच्या धर्तीवर लीग स्पर्धा सुरू करण्यास उत्सुक आहे.

यासंदर्भात लवकरच योजना जाहीर करू. या खेळात मोठ्या प्रमाणात नवोदितांना सामील करुन प्रेरित करण्यासाठी आम्ही कॉर्पोरेट भागीदारांना निमंत्रित करत आहोत. चाहते आणि भागधारकांच्या सततच्या पाठिंब्याने गोव्यातील टेबल टेनिस नवीन उंची गाठेल या आम्हाला विश्वास वाटतो.’’

यावेळची यूटीटी स्पर्धा चेन्नई येथे झाली. अंतिम लढतीत गोवा चॅलेंजर्सने हरमीत देसाई व यांग्झी लियू याच्या दमदार खेळाच्या बळावर दबंग दिल्ली संघाला नमवून सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. स्पर्धेत हरमीत सर्वोत्तम भारतीय टेबल टेनिसपटू ठरला, तर मौल्यवान खेळाडूचा मान लियू याला मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT