Goa vs Chandigarh womens T20 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

T20 Tournament: गोव्याच्या महिलांचा रोमहर्षक विजय! चंदीगडचा पराभव; अनुभवी 'सुनंदा'ची अष्टपैलू खेळी

Goa vs Chandigarh womens T20: अनुभवी सुनंदा येत्रेकर हिच्या शानदार अष्टपैलुत्वामुळे गोव्याने सीनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत शनिवारी रोमहर्षक विजय नोंदविला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अनुभवी सुनंदा येत्रेकर हिच्या शानदार अष्टपैलुत्वामुळे गोव्याने सीनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत शनिवारी रोमहर्षक विजय नोंदविला. पावसामुळे प्रत्येकी सहा षटकांचा करण्यात आलेल्या सामन्यात त्यांनी चंडीगडला सात विकेट आणि अखेरचा एक चेंडू राखून हरविले.

एलिट ड गटातील सामना छत्तीसगडमधील रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर झाला. गोव्याने नाणेफेक जिंकून चंडीगडला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. सुनंदाच्या (२-१५) प्रभावी गोलंदाजीमुळे गोव्याने चंडीगडला निर्धारित ६ षटकांत ३ बाद ६२ धावांत रोखले.

सुनंदाने (नाबाद १५) नंतर पूर्वा भाईडकर (नाबाद ८) हिच्या साथीत अखेरच्या षटकात यशस्वीपणे खिंड लढवत गोव्याला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवून दिला. सुनंदा सामन्याची मानकरी ठरली. यापूर्वी गोव्याने उत्तराखंडला १३ धावांनी हरविले होते, झारखंडविरुद्ध सात विकेटने पराभव पत्करावा लागला होता. गोव्याचे आता तीन लढतीतून आठ गुण झाले आहेत.

संक्षिप्त धावफलक : चंडीगड : ६ षटकांत ३ बाद ६२ (मोनिका पांडे ३०, पारुषी प्रभाकर १६, आराधना बिश्त नाबाद १३, श्रेया परब १-०-१३-०, सुनंदा येत्रेकर २-०-१५-२, तनया नाईक २-०-२२-१, मेताली गवंडर १-०-११-०) पराभूत वि. गोवा : ५.५ षटकांत ३ बाद ६३ (पूर्वजा वेर्लेकर १४, संजुला नाईक १३, हर्षिता यादव ११, पूर्वा भाईडकर नाबाद ८, सुनंदा येत्रेकर नाबाद १५, ज्योती कुमारी २-०-२१-२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हडफडे दुर्घटना; गर्दी आणि लहान दरवाज्यांमुळे लोक अडकले, पळून जाण्यासाठी मार्गच नव्हता; प्राथमिक तपासात धक्कादायक खुलासे

हडफडे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, तर जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत; CM प्रमोद सावंतांची घोषणा

Goa Bread History: 1500च्या दशकात पोर्तुगिज आले, भारतात सर्वांत पहिला 'पाव' गोव्यात तयार झाला; इथून तो मुंबईत गेला..

VIDEO: LIVE सामन्यात 'हाय-व्होल्टेज' ड्रामा! बाचाबाचीनंतर संतापलेल्या आर्चरचा बाउन्सर, स्मिथनं थेट षटकार ठोकत दिलं उत्तर

30 कोटी रुपयांची फसवणूक, चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना अटक; मनोरंजन विश्वात खळबळ!

SCROLL FOR NEXT